शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'मोदींना घेरलं, त्यांच्या २०१४ मधील प्रतिमेला मोडलं, काँग्रेसनं 'ए ग्रेड' काम केलं!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 18:05 IST

राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे 4-5 दिवस शिल्लक असताना पंतप्रधान पहिली पत्रकार परिषद घेतात ही अभूतपूर्व बाब आहे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लगावला. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्यावरुन राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं. आम्ही मोदींच्या खोटेपणाचा पर्दाफाश केल्याचंदेखील राहुल म्हणाले. त्यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. पाच वर्षांत काँग्रेसनं विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केलं. काँग्रेसची कामगिरी ए ग्रेड होती, असं प्रशस्तीपत्रक त्यांनी स्वत:च्या पक्षाला दिलं. मोदींना घेरण्याचं काम काँग्रेसनं केलं. 2014 मधील मोदींच्या प्रतिमा मोडण्यात काँग्रेसचा महत्त्वाचा वाटा असल्याचंदेखील ते म्हणाले. पंतप्रधान म्हणून मोदींनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेवर त्यांनी सडकून टीका केली.पाच वर्षांत मोदी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत आहेत. मात्र त्यांनी माझ्यासोबत राफेलच्या मुद्द्यावर वादविवाद करण्याचं आव्हान स्वीकारलं नाही. मी त्यांना वादविवादासाठी उघड आव्हान दिलं होतं. पण त्यांनी हे आव्हान स्वीकारलंच नाही. त्यांनी हे आव्हान का स्वीकारलं नाही, याचं उत्तर त्यांनी पत्रकारांना द्यावं, असं राहुल म्हणाले. मोदी प्रत्येकाला 15 लाख रुपये देणार होते. मात्र त्यांचं आश्वासन खोटं होतं, हे आम्ही जनतेला सांगितलं. आता जनतेला काय वाटतं, याचा कौल 23 मे रोजी मिळेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही सडकून टीका केली. 'या निवडणुकीत निवडणूक आयोग निष्पक्ष नव्हता. पंतप्रधान मोदी प्रचारात काहीही बोलत होते. मात्र तीच विधानं आम्ही केल्यास निवडणूक आयोगाकडून आक्षेप घेतला जात होता. मोदींच्या प्रचार कार्यक्रमानुसार निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम आखला होता. मोदी आणि भाजपानं निवडणुकीत सत्ता आणि पैशाचा बेसुमार वापर केला. पण आम्ही सत्य घेऊन लढलो,' अशा शब्दांत राहुल यांनी पंतप्रधानांसह निवडणूक आयोगावर तोफ डागली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसRafale Dealराफेल डील