शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रचार करताय की घोडेबाजार? तृणमूलचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 08:02 IST

40 आमदार संपर्कात असल्याच्या मोदींच्या विधानाचा समाचार

सेरामपूर: तृणमूलचे 40 आमदार संपर्कात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल पश्चिम बंगालमध्ये जनसभेला संबोधित करताना केला. मोदींच्या या विधानाला तृणमूल काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं. एक्स्पायरी बाबू, तुमच्यासोबत 1 नगरसेवकदेखील जाणार नाही, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पंतप्रधानांवर पलटवार केला. त्यांनी मोदींवर घोडेबाजाराचादेखील आरोप केला. पंतप्रधान मोदींनी सेरामपूरमधील जनसभेत तृणमूलचे 40 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. निवडणुकीनंतर तृणमूलचे अनेक आमदार पक्ष सोडणार असल्याचं मोदी जाहीर सभेत म्हणाले. मोदींच्या या विधानाला ओब्रायन यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं. 'कोणीही तुमच्या सोबत जाणार नाही. एक नगरसेवकदेखील जाणार नाही,' असं ओब्रायन यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यात त्यांनी मोदींचा उल्लेख एक्स्पायरी बाबू असा केला. तुम्ही निवडणूक प्रचार करताय की घोडेबाजार, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. मोदींच्या विधानाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंदेखील ते म्हणाले. काल (सोमवारी) मोदींनी जनसभेला संबोधित करताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. 'देशाची जनता चुकीला क्षमा करेल. मात्र विश्वासघाताला कधीही माफ करणार नाही. दीदी, तुमच्या पायाखालील जमीन सरकली आहे. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल येईल आणि चारही दिशांना कमळ उमलेल. तेव्हा तुमचे आमदार तुम्हाला सोडून पळून जातील. आजही तुमचे 40 आमदार आमच्या संपर्कात आहेत,' असं मोदींनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा