शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

Lok Sabha Election 2019: उमेदवारीवरून भाजपात घमासान; काही खासदारांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 04:31 IST

भाजपाकडून पुण्यात कोण; लातूरमध्ये उमेदवार बदलण्याचा निलंगेकर यांचा आग्रह

- यदु जोशीमुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सत्तारुढ भाजपात उमेदवारीवरून घमासान सुरू झाले आहे. सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्यासह काही विद्यमान खासदारांचे तिकिट कापले जाऊ शकते.पुणे मतदारसंघातून लढण्याची तेथील पालकमंत्री गिरीश बापट यांची तीव्र इच्छा असून त्यांनी तसे पक्षाला कळविलेदेखील आहे. भाजपाचे सहयोगी राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी रविवारी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण सध्या वेगळ्या घडमोडी घडल्याने काकडे यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. मात्र काकडे यांचे मनपरिर्वतन केल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर याबाबत आपण कोणतीही भूमिका अद्याप न घेतल्याचे काकडे यांनी सांगितले.लातूरमध्ये विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या उमदेवारीला तेथील पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तीव्र विरोध दर्शविला असल्याची माहिती आहे. गायकवाड यांनी भाजपा कार्यालयात येऊन आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. गोंदिया-भंडारा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाने पोवार समाजाचे हेमंत पटले यांना उमेदवारी दिली होती व त्यांचा राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी पराभव केला होता. यावेळी कुणबी समाजाला संधी द्यावी, असा विचार भाजपात असून त्या दृष्टीने विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके, माजी आमदार रमेश कुथे, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांची नावे विचाराधीन आहेत. इतरही सोलापूरमध्ये बनसोडे यांच्याऐवजी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, हे निश्चित आहे.वर्धा मतदारसंघात विद्यमान खा. रामदास तडस यांना डावलून गेल्या वेळचे काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांना संधी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. तडस हे तेली समाजाचे आहेत आणि पूर्व विदर्भात हा समाज मोठ्या संख्येने आहे. तडस यांना डावलल्याने या समाजाची नाराजी ओढावू शकते.मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या दिवसभर बैठकाभाजपाच्या मुंबई कार्यालयात आज दिवसभर बैठकींचा धडाका सुरु होता. आधी निवडणूक यंत्रणा समितीच्या जिल्हावार बैठकी झाल्या. सायंकाळी ज्येष्ठ नेत्यांची पुन्हा एक बैठक झाली. दोन्ही बैठकींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा