शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची उमेदवार यादी अडकली शुभ-अशुभाच्या चक्रात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 10:34 IST

उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकासाठी उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र सत्ताधारी भाजपानं अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून जोरदार इनकमिंग सुरू आहे. तरीही त्यांच्याकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात न आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या होलाष्टक सुरू असल्यानं भाजपाकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जात नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.होळीच्या आधीचे आठ दिवस होलाष्टक असतं. या काळात शुभ कार्य वर्ज्य मानलं जातं. त्यामुळेच भाजपाकडून उमेदवार यादी जाहीर केली जात नसल्याची चर्चा आहे. होलाष्टक संपल्यावर भाजपाकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाऊ शकते. भाजपा पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कापणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाचे सध्या 22 खासदार आहेत. यंदा भाजपा राज्यात 25 जागा लढवणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपामध्ये जोरदार इनकमिंग झाल्यानं कोणकोणत्या विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जाणार आणि त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसनं राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीनं दोन याद्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीनं उमेदवारांच्या यादीत आघाडी घेतली असली, तरी त्यांना बिघाडीचा सामनादेखील करावा लागला आहे. याचा थेट फायदा भाजपाला झाला आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर सोलापूरातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते-पाटील आज भाजपवासी होणार आहेत. भाजपानं आतापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर न केल्यानं त्यांना बंडखोरीचा फटका बसलेला नाही.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस