शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके..; आशिष शेलारांचा पवारांना काव्यमय टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:39 IST

पवार कुटुंबातील घडामोडींवरुन आशिष शेलारांचा चिमटा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कवितेतून टोला लगावला आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून घेतलेली माघार, पार्थ पवार यांना देण्यात आलेली उमेदवारी यावरुन शेलार यांनी चिमटा काढला आहे. त्यासाठी त्यांनी दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा आधार घेतला आहे. 'आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके.. आजोबांच्‍या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके..', असा टोला शेलार यांनी लगावला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबात सुरू असलेल्या घडामोडींवरुन आशिष शेलार यांनी एक ट्विट करुन निशाणा साधला. 'एक नातू म्‍हणाला आजोबा आजोबा निवडणुका तुम्‍हीच लढवा...दुसरा नातू म्‍हणाला आजोबा आजोबा मीच "पार्थ" मीच लढणार... आजोबांना होती ताईंची काळजी...दादांना पोराची.. जाणते आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके.. मुके.. आजोबांच्‍या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके!', असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. पण अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक लढवायची असल्यानं एकाच कुटुंबातून किती जण निवडणूक लढवणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. याशिवाय गेल्या निवडणुकीत बारामतीमधून अतिशय निसटता विजय मिळवणाऱ्या सुप्रिया सुळेंसमोर यंदाही आव्हान असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आशिष शेलारांनी पवारांना राजकीय टोला लगावला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलार