शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Lockdown:“नियम न पाळता कोणी रस्त्यावर आला तर त्याला किंमत मोजावी लागेल”; मंत्री जयंत पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 6:11 PM

निवडणूक आयोगाने तारतम्य बाळगणे आवश्यक होते, रुग्णवाढीवरून जयंत पाटलांची निवडणूक आयोगावर टीका

ठळक मुद्देराज्यात कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. आता जनतेनेही निर्बंध पाळले पाहिजेत.निवडणूक आयोगाने जरा तारतम्य बाळगले असते तर परिस्थिती गंभीर बनली नसती. संसर्ग टाळण्यासाठी देशभरात कोणत्याही निवडणूका घेणे उचित नव्हते मात्र निवडणूक आयोगाने देशभरात निवडणुका घेतल्या

सांगली : संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. असे वातावरण असताना निवडणूक आयोगाने कोणत्याही निवडणूक घेणे चुकीचे होते. ज्या ठिकाणी निवडणूक झाल्या आहेत तिथे कोरोनाचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे निवडणुकांचे नियोजन करताना निवडणूक आयोगाने तारतम्य बाळगणे आवश्यक होते अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, देशात कोरोनाची लाट वेगाने वाढत आहे. संसर्ग टाळण्यासाठी देशभरात कोणत्याही निवडणूका घेणे उचित नव्हते मात्र निवडणूक आयोगाने देशभरात निवडणुका घेतल्या. निवडणूक आयोगाने जरा तारतम्य बाळगले असते तर परिस्थिती गंभीर बनली नसती. ज्या राज्यात निवडणूका झाल्या तिथे करोनाचे परिमाण दिसून येत आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच राज्यात कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. आता जनतेनेही निर्बंध पाळले पाहिजेत. पोलिसी खाक्या दाखवून कोणालाही बंधनात ठेवायचे नाही, मात्र नियम न पाळता कोणी रस्त्यावर आला तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही जयंत पाटलांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दिला आहे. त्याचसोबत रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. पोलिसांनी याआधी दोघाना अटक केली आहे याप्रकरणात आणखी कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर ही कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJayant Patilजयंत पाटीलElectionनिवडणूक