शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

LMOTY 2020 : "...तेव्हा संपूर्ण भाजपा सचिन वाझेंच्या पाठीशी उभा राहिला होता," नवाब मलिकांचा खळबळजनक दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 18:26 IST

Nawab Malik sensational claim about BJP & Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणावरून विरोधी पक्ष असलेला भाजपा सत्ताधाऱ्यांवर दररोज नवनवे आरोप करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार पलटवार करत सनसनाटी आरोप केला आहे.

मुंबई - सचिन वाझे प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. तसेच सत्ताधारी महाविकास आघाडी सकारमधील नेत्यांची चिंता वाढली आहे.(Nawab Malik sensational claim about BJP & Sachin Vaze ) विरोधी पक्ष असलेला भाजपा या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर दररोज नवनवे आरोप करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार पलटवार करत सनसनाटी आरोप केला आहे. ( " in 2004 the whole BJP was standing behind Sachin Vaze," a sensational claim by Nawab Malik)

आज लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न झाला. या सोहळ्याला नवाब मलिक हे उपस्थि होते. यावेळी सचिन वाझे प्रकरणावरून भाजपाकडून शिवसेना आणि राज्य सरकारवर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, आज देवेंद्र फडणवीस हे शिवसेना सचिन वाझेंची बाजू घेतेय, म्हणून आरोप करत आहे. मात्र २००४ मध्ये जेव्हा सचिन वाझेंचे निलंबन झाले होते. तेव्हा संपूर्ण भाजपा सचिन वाझेंच्या बाजूने उभी राहिली होती. विधानसभेमध्येही सचिन वाझेंची बाजू घेतली जात होती. तेव्हा तुम्हाला सचिन वाझे चांगला वाटत होता. आता शिवसेनेवर खापर फोडताना आधी आपली भूमिका काय होती, हे भाजपानं सांगणं गरजेचं आहे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. 

दरम्यान, यावेळी उपस्थित असलेले राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण सचिन वाझे प्रकरणाबाबत म्हणाले की, या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. ते कुणालाही पाठीशी घालणार नाहीत. तिन्ही पक्षांचीही तशीच मागणी आहे. तसेच सरकारमध्येही कुठल्याही प्रकारची अस्वस्थता नाही आहे. तसं पाहायला गेले तर सचिन वाझे खूप लहान माणूस आहे. या प्रकरणानी निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र या प्रकरणात सध्या भाजपा ट्रायल सुरू आहे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.   

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेnawab malikनवाब मलिकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020