प्रताप सरनाईक यांच्यावर किरीट सोमय्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 23:45 IST2020-12-18T23:45:07+5:302020-12-18T23:45:25+5:30
प्रताप सरनाईक यांचा हा तिसरा घोटाळा आहे. सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले होते.

प्रताप सरनाईक यांच्यावर किरीट सोमय्यांचा आरोप
कल्याण : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर मोहित अग्रवाल यांचा एनएसईएलचा २५० कोटी रुपयांचा घोटाळा यापूर्वी बाहेर आला होता. त्या पैशांतून त्यांनी कल्याण तालुक्यातील गुरुवली येथे ७८ एकर जमीन खरेदीचे व्यवहार केले आहेत. त्यांवर ईडीची जप्ती आली असताना हे व्यवहार पुढे सुरूच आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी कल्याणमध्ये केला आहे.
प्रताप सरनाईक यांचा हा तिसरा घोटाळा आहे. सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले होते. त्यावर सोमय्या म्हणाले की, ‘एक रुपयांचाही दावा ते माझ्याविरोधात दाखल करू शकत नाहीत. सरनाईक यांनी आधी जनतेच्या फसवणुकीचा जाब द्यावा.’