शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

Kerala Assembly Election Result 2021 Highlights: काँग्रेसची पिछेहाट, डावे सुस्साट, सुरुवातीच्या कलांमध्ये बहुमत; केरळमध्ये इतिहास घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 09:42 IST

Kerala Assembly Election Result 2021 Highlights: केरळमध्ये डावे सत्ता राखण्याची शक्यता; १४० पैकी ८० हून अधिक जागांवर आघाडी

Kerala Assembly Election Result 2021 Highlights- थिरुअनंतपुरम: काँग्रेस आणि डाव्यांना आलटून पालटून संधी देणाऱ्या केरळमध्ये यंदा इतिहास घडण्याची शक्यता आहे. डाव्यांच्या नेतृत्त्वाखाली एलडीएफ सत्ता कायम राखेल, असे कल हाती आले आहेत. विधानसभेच्या एकूण १४० जागा असलेल्या केरळमध्ये सध्या डाव्यांनी ८१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफनं ५१ जागांवर मुसंडी मारली आहे. दोनच दिवसांपूर्वी आलेल्या एक्झिट पोल्सनी डाव्यांना बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता. तो आता खरा ठरताना दिसत आहे.केरळमधील निवडणूक डाव्यांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा या डाव्यांच्या बालेकिल्ल्यांना तृणमूल काँग्रेस आणि भाजपनं धक्का दिला. २०१८ मध्ये भाजपनं त्रिपुराची सत्ता मिळवली. तर २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेत आहेत. त्यामुळे आता केरळ हाच डाव्यांचा एकमेव बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन सध्या तरी बालेकिल्ला राखताना दिसत आहेत. केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि माकपप्रणित एलडीएफ यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र या राज्यात भाजपनंदेखील मोठी ताकद लावली होती. मात्र सध्या तरी त्यांना इथे यश मिळताना दिसत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन कोन्नी आणि मांजेश्वर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पिछाडीवर आहेत. तर निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले मेट्रोमॅन पलक्कड विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत.निवडणुकीचे प्रमुख प्रश्न कोणते?भ्रष्टाचार: एलडीएफने वादळ, पूर, निपा विषाणू, कोविड या सर्व प्रकारच्या संकटांचा सामना केला आहे. परंतु निवडणुकीत सोन्याच्या तस्करीसारख्या बाबींशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.शबरीमाला हा मोठा मुद्दा आहे. विशेषत: मध्य आणि दक्षिण केरळमध्ये.

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेस