शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Kerala Assembly Election Result 2021: केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 18:24 IST

Kerala Assembly Election Result 2021: केरळमध्ये सत्तापरिवर्तनाची परंपरा खंडित; डाव्यांची सत्ता कायम राहणार

तिरुअनंतपुरम: केरळमध्ये डाव्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत सत्ता राखली आहे. केरळात दर पाच वर्षांनी सत्तापरिवर्तन होतं. १९८० पासून सत्तापरिवर्तनाची परंपरा सुरू आहे. मात्र अखेर ४० वर्षांनी ही परंपरा खंडित झाली आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली एलडीएफनं विजय मिळवला आहे. सध्या एलडीएफचे उमेदवार १४० पैकी ९३ जागांवर पुढे आहेत. तर काँग्रेसप्रणित यूडीएफ ४३ मतदारसंघांत आघाडीवर आहे.गेल्या निवडणुकीत एलडीएफला ९१ जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत एलडीएफच्या जागा वाढल्या आहेत. विशेष म्हणजे केरळमधील सत्ता परिवर्तनाची परंपरा डाव्यांनी खंडित केली आहे. त्यामुळे काँग्रेसप्रणित यूडीएफला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावं लागेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं केरळमध्ये खातं उघडलं होतं. भाजपचा एक उमेदवार विजयी झाला होता. आताही भाजपचा एकच उमेदवार आघाडीवर आहे. मेट्रोमॅन म्हणून ओळख असलेल्या ई. श्रीधरन यांना भाजपनं पलक्कडमधून उमेदवारी दिली होती. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये त्यांनी आघाडीही घेतली. मात्र त्यानंतर ते पिछाडीवर गेले. काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीच्या शफी परमबिल यांनी त्यांचा पराभव केला. मुख्यमंत्री पिनरायी विजयन, आरोग्यमंत्री के. के. शैलजा, माजी मुख्यमंत्री ओमान चंडी, विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी त्यांच्या मतदारसंघात आगेकूच कायम राखली आहे. 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेसBJPभाजपा