शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Kerala assembly Election 2021 : RSS चा स्मगलरांशी काय संबंध? केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अमित शाहांना बोचरा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 11:08 IST

Kerala assembly Election 2021: केरळमधील सोने आणि डॉलरच्या तस्करीची लिंक ही केरळ सरकारशी जुळली असल्याचा आरोप अमित शाहा यांनी केला होता. तपास यंत्रणांचा हवाला देऊन शाहा यांनी हा आरोप केला होता.

ठळक मुद्देअमित शाहा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केरळचा अपमान केलाअनेक एजन्सींनी भारतामध्ये केरळ हे सर्वात कमी भ्रष्ट असल्याचे प्रमाणित केले आहे काँग्रेसनेसुद्धा अमित शाहांच्या या विधानावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, कारण हे दोघेही एकसारखेच आहेत

तिरुवनंतपुरम - केरळमधील सत्ताधारी डावे पक्ष आणि मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करणारे गृहमंत्री अमित शाहा यांना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (P. Vijayan ) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Kerala assembly Election 2021) अमित शाहा (Amit Shah)यांनी सोने आणि डॉलर तस्करीच्या प्रकरणात केरळ सरकारला सात प्रश्न विचारले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आता विजयन यांनी RSS चा स्मगलरांशी काय संबंध आहे, असा प्रतिप्रश्न अमित शाहांना विचारला आहे. (What is relation between RSS with smugglers? question of Kerala Chief Minister P. Vijayan to Amit Shah)

 केरळमधील सोने आणि डॉलरच्या तस्करीची लिंक ही केरळ सरकारशी जुळली असल्याचा आरोप अमित शाहा यांनी केला होता. तपास यंत्रणांचा हवाला देऊन शाहा यांनी हा आरोप केला होता. तस्करीतील आरोपींनी मुख्यमंत्री विजयन, विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन आणि अनेक मंत्र्यांविरोधात सनसनाटी आरोप केल्याचे कस्टम विभागाने हायकोर्टात सांगितल्याचा दावा अमित शाहा यांनी केला होता. 

अमित शाहांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी हे आरोप म्हणजे केरळचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, अमित शाहा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केरळचा अपमान केला. केरळ ही भ्रष्टाचाराची भूमी असल्याचे ते म्हणाले. अनेक एजन्सींनी भारतामध्ये केरळ हे सर्वात कमी भ्रष्ट असल्याचे प्रमाणित केले आहे. मात्र काँग्रेसनेसुद्धा अमित शाहांच्या या विधानावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, कारण हे दोघेही एकसारखेच आहेत. विजयन पुढे म्हणाले की, संघ परिवारामधील एक ज्ञात व्यक्ती डिप्लोमॅटिक बॅगेजमध्ये सोन्याची तस्करी करण्यामधील मुख्य सूत्रधार नाही आहे? तुम्हाला हे माहिती नाही आहे का? सीमा शुल्क पूर्णपणे सोन्याच्या तस्करीसारख्या देशविरोधी कृतीला रोखण्यासाठी जबाबदार नाही आहे. तिरुवनंतपुरम विमानतळ पूर्णपणे केंद्र सरकारच्या अधीन नाही आहे, अशी प्रश्नांची सरबत्तीच विजयन यांनी केली. भाजपा सत्तेवर आल्यानंतर तिरुवनंतपुरम विमानतळ सोन्याच्या तस्करीचे केंद्र कसे बनले? सोन्याची तस्करी सुलभपणे करण्यासाठी या विमानतळावरील विविध पदांवर संघ परिवारातील लोकांची जाणीवपूर्वक नियुक्ती नाही करण्यात आली नाही का? असा सावालही विजयन यांनी केला.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ