शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Karunanidhi Death Update: करुणानिधींनीही एकेकाळी स्मारकाला जागा नाकारलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 10:26 IST

Karunanidhi Death : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या स्मारकासाठी जागा नाकारल्याचा राज्य सरकारचा मद्रास उच्च न्यायालयात दावा

चेन्नई : करुणानिधी यांच्या स्मारकासाठी एआयडीएमकेने जागा नाकारल्यावरून तामिळनाडूमध्ये वाद निर्माण झालेला असताना, राज्य सरकारने करुणानिधींनीही राजशिष्टाचारावर बोट ठेवत माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या स्मारकासाठी जागा नाकारल्याचा दावा मद्रास उच्च न्यायालयात केला आहे. चेन्नईच्या मरिना बीचवर दीड वर्षापूर्वी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा अंत्यविधी आणि स्मारक उभारले गेले होते. याविरोधात काही नागिरकांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत बीचवर स्मारकांच्या उभारणीवर बंदी आणण्यासंबंधी याचिका दाखल केल्या होत्या. त्या आज, बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.  डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या मृत्यूमुळे त्यांचेही स्मारक मरिना बीचव व्हावे अशी मागणी त्यांचे पूत्र स्टॅलिन यांनी मंगळवारी केली होती. मात्र, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी ती फेटाळली होती. याविरोधात डीएमकेने मद्रास उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच याला प्रत्युत्तर म्हणून राज्य सरकारनेही अपिल दाखल केले आहे. या सुनावणी दरम्यान, गेल्या वर्षी ट्रॅफिक रामास्वामी, पीएमकेचे नेते के बाळू आणि डीकेचे नेते दाराईस्वामी यांनी जयललिता यांचे स्मारक मरिना बीचवर उभारल्याविरोधात याचिका दाखल केल्या होत्या, त्या आज फेटाळण्यात आल्या आहेत. रामास्वामी यांनी करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध नसल्याचे न्यायालयास सांगितले. तर, राज्य सरकारने दाखल केलेल्या अपिलामध्ये, करुणानिधी यांनी मुख्यमंत्री असताना राजशिष्टाचाराचा दाखला देत एमजी रामचंद्र यांच्या पत्नी जानकी रामचंद्र यांच्या मरिना बीचवरील स्मारकाला जागा नाकारली होती. यामुळे आजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांना एक सारखीच वागणूक देणे राजशिष्टाचाराला धरून नसल्याने करुणानिधी यांच्या स्मारकासाठी जागा नाकारण्यात आल्याचे म्हटले आहे. 

राज्य सरकारकडून दुसऱ्या जागेचा पर्यायडीएमकेकडून करुणानिधी यांच्या स्मारकासाठी अण्णा मेमोरिअलच्या जागेची मागणी करण्यात आली असताना तामिळनाडू सरकारने मात्र, त्यांना अण्णा विद्यापीठासमोरची पर्यायी जागा सुचवली आहे. ही जागा सरदार पटेल रोडवर दोन एकर एवढी मोठी आहे. मात्र, इतर नेत्यांची स्मारके मरिना बीचवर असल्याने डीएमकेही हट्टाला पेटली आहे.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीChennaiचेन्नई