शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
6
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
7
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
8
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
9
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
10
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
11
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

कन्हैया कुमारने स्वपक्षीय नेत्यावरच उगारला हात, सीपीआयने पारित केला निषेध प्रस्ताव

By बाळकृष्ण परब | Published: February 05, 2021 2:58 AM

Kanhaiya Kumar News : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा नेता आणि जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार सध्या वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

नवी दिल्ली - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा नेता आणि जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार सध्या वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कन्हैया कुमार कुमार विरोधात त्याच्याच पक्षाकडून निषेध प्रस्ताव पारित केला गेला आहे. कन्हैया कुमारने स्वपक्षीय नेत्यावर हात उगारल्याचा आरोप झाला असून, त्याच पार्श्वभूमीवर हैदराबादमधील नॅशनल कौन्सिलच्या बैठकीत हा निषेष प्रस्ताव पारित केला गेला आहे.  

हैदराबादमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत कन्हैया  कुमार याला स्पष्ट शब्दात ताकीदही दिली गेली आहे. कन्हैयाने यापूर्वीही आपल्या पक्षावर टीका केली होती. त्यावेळी तो सीपीआयला कन्फ्युजन पार्टी ऑफ इंडिया म्हणाला होता. दरम्यान, सीपीआयच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की बैठकीत, ११० सदस्य उपस्थित होते. त्यापैकी केवळ तीन जणांना सोडून इतर सर्वांनी कन्हैया कुमार विरोधातील निषेध प्रस्तावाला पाठिंबा दिला.विविध आंदोलनांमुळे अल्पावधीत राष्ट्रीय पातळीवर चमकलेला कन्हैया कुमार  आपल्या पाठिराख्यांसह १ डिसेंबर २०२० रोजी बेगुसराय जिल्हा कौन्सिलची बैठक घेण्यासाठी पाटणा येथील कार्यालयात पोहोचला होता. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही बैठक स्थगित झाली. कन्हैया कुमारला बैठक स्थगित झाल्याची माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे तो संतापला. रागाच्या भारात त्याने आणि त्याच्या पाठीराख्यांनी बिहार प्रदेश कार्यालयाचे सचिव इंदुभूषण वर्मा यांच्यासोबत गैरवर्तन केले, तसेच धक्काबुक्की करून मारहाण केली होती.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाBiharबिहारPoliticsराजकारण