शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

CoronaVirus in Pune: 'जम्बो कोविड सेंटर' राजकीय दहशतीखाली?; 'हाऊसकिंपिंग'सह अन्य कंत्राटांसाठी दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 22:04 IST

CoronaVirus in Pune: तीन आठवड्यांपूर्वी पालिकेने जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात आरोग्य व्यवस्था पुन्हा हेलखावे खाऊ लागली आहे.

पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही रुग्णांना दिलासा देणाऱ्या जम्बो कोविड सेंटरचे प्रशासन राजकीय दहशतीखाली काम करीत असल्याचे चित्र आहे. काही 'मातब्बर' नगरसेवक जम्बोमधील हाऊसकीपिंग, जेवण आणि अन्य कामांची कंत्राटे त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्याबाबत दबाव टाकत आहेत. अन्यथा केलेल्या कामाची बिले कशी निघतात तेच बघतो अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ७०० रुग्णांच्या जीवितापेक्षा कार्यकर्त्यांचे खिसे भरणे अधिक महत्त्वाचे आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Political pressure for Remdesivir injection and other contracts in jumbo covid center at pune)

तीन आठवड्यांपूर्वी पालिकेने जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात आरोग्य व्यवस्था पुन्हा हेलखावे खाऊ लागली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत यावेळी आरोग्य व्यवस्था अधिक बळकट झाली असली तरी ती वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमीच पडत आहे. पहिल्या लाटेत जम्बो कोविड सेंटरचा आधार मिळाला होता. दुसऱ्या लाटेमध्येही तब्बल ७०० रुग्णांवर याठिकाणी उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. रुग्णांवर उपचारांसाठी मेडीब्रोस ही एजन्सी नेमण्यात आलेली आहे. याठिकाणी उपचरांसोबतच दैनंदिन स्वच्छता, लॉंड्री, झाडणकाम, कँटीन आदी कामे केली जातात. ही कामे मिळविण्यासाठी काही नगरसेवक प्रशासनावर दबाव टाकत आहेत. ही कामे आपल्याच कार्यकर्त्यांना देण्यासाठी काही नगरसेवक थेट धमकावणीच्या सुरातच बोलत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णालय प्रशासन धास्तावले आहे. जम्बो कोविड सेंटरचे व्यवस्थापन पीएमआरडीएकडे असताना हे प्रकार घडत नव्हते. परंतु, यावेळी पूर्णपणे जम्बो पालिकेच्या ताब्यात आहे. जम्बो पालिकेच्या ताब्यात येताच काही नगरसेवकांची 'हिशेबी' वृत्ती जागी झाली आहे.'रेमडेसिविर'साठी थेट आत घुसून दादागिरी'रेमडेसिविर' इंजेक्शनसाठी रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. काही राजकीय कार्यकर्ते रविवारी सकाळी जम्बो कोविड सेंटरमध्ये घुसले. ''आम्हाला आत्ताच्या आत्ता इंजेक्शन द्या'' अशी धमकवणीची भाषा सुरू केली. जम्बोमधील रूग्णांसाठी हे इंजेक्शन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, या कार्यकर्त्यांनी 'इंजेक्शन' न मिळाल्यास तोडफोड करण्याची धमकी दिल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे