शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही"; गणेश नाईकांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 20:57 IST

Navi Mumbai Election Politics : नवी मुंबई महानगर पालिकेत तीन पक्षांनी आघाडी झाल्यास त्यांच्यासमोर निवडून येणे कठीण जाणार असल्याने भाजपाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नगरसेवकांची गळती सुरू झाली आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या तोंडावर शिवसेनेने भाजपात गेलेल्या नाईक गटाचे नगरसेवक फोडल्याने गणेश नाईक यांच्या जिव्हारी लागले आहे. या फोडाफोडीवर भाष्य करताना गणेश नाईक खळबळजनक वक्तव्य केले आहे. (Ganesh Naik gave warning to Shivsena before Navi mumbai municipal Election)

इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात घाबरायचं नाही, असे नाईक म्हणाले. .यावर शिवसेनेने देखील लगेचच प्रत्यूत्तर दिले असून गणेश नाईक इंटरनॅशनल डॉन असतील तर आम्ही नवी मुंबईत डॉन आहोत, असे शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी म्हटले आहे. यावरून नवी मुंबईतील पालिका निवडणूक किती चुरशीची होणार आहे हे दिसू लागले आहे. 

तुर्भेमधील भाजपच्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असे गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

नाईक गटाला गळतीनवी मुंबई महानगर पालिकेत तीन पक्षांनी आघाडी झाल्यास त्यांच्यासमोर निवडून येणे कठीण जाणार असल्याने भाजपाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नगरसेवकांची गळती सुरू झाली आहे. गणेश नाईक समर्थक असलेल्या 14 नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेत 11 तर राष्ट्रवादीमध्ये 3 नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. यावर नाईकांनी आपण शिवसेनेचे दुप्पट नगरसेवक फोडणार असल्याचा इशारा दिला होता.  

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई