शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

अंतर्गत गटबाजी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:39 AM

राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याने व ‘ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला जागा’ या सूत्रानुसार तालुक्यातील जागा पक्षाला राहणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.

- सतीश सांगळेराज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याने व ‘ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला जागा’ या सूत्रानुसार तालुक्यातील जागा पक्षाला राहणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने व बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनीही आमदारकी लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काही दिवसांपासून तालुक्यात विविध विकासकामे व उद्घाटन करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, त्यांनी अंतर्गत गटबाजीत न डोकावता विकासकामांवर जोर दिला आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनीही जिल्हा परिषदेचे माध्यमातून मोठा निधी आणला आहे.युवकांसाठी बेरोजगार मेळावा तसेच सोनाई परिवाराच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या माध्यमातून तयारी चालू केली आहे. बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी सहा महिन्यांपासून आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बाजार समितीचे माध्यमातून पक्षाचे नेते शरद पवार व अजित पवार यांना कृषी प्रदर्शन कार्यक्रमाला बोलावून शक्तिप्रदर्शन केले आहे.सोशल मीडियावर नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. तालुक्यात पहिल्या फळीतील नेत्यांनी पक्षापेक्षा स्वत:चा गट मजबूत करण्यावर भर दिला आहे. तालुक्यात पक्षाने महत्त्वाची पदे देऊन संघटन वाढविण्यासाठी भर दिला. मात्र, तालुक्यात गटबाजी वाढली असल्याने पक्षासाठी डोकेदुखी ठरली आह.े पक्षाचे तालुकाप्रमुख व जिल्हा सभापती यांच्यातील निमंत्रण पत्रिकेतील वादावरून अजित पवार यांनी मागील इंदापूर दौऱ्यात जाहीर फटकारले होते.तसेच, मागील आठवड्यातही शेळगाव येथील जाहीर सभेत त्यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन छत्रपतीचे संचालक अ‍ॅड. लक्ष्मणराव शिंगाडे व बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने यांना समज दिली व तालुक्यात गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.पक्षापेक्षा कोणी मोठा नसून, पक्षामुळेच मलाही किंमत असल्याचे सांगत गटबाजांना चांगलाच दम भरला आहे. जिथं तुम्ही एक नेता मानता, पक्ष मानता तेथे तुम्हाला एकाजिवाने राहावे लागणार आहे. हा सल्ला केवळ इंदापूर, बारामतीतील नेत्यांसाठी नसून जिल्ह्यातील नेत्यांसाठी असल्याचेही त्यांनी भाषणात स्पष्ट केले.पक्षाला अंतर्गत गटबाजीतूनच तालुका पंचायत समितीच्या सत्तेला मुकावे लागले होते. त्यामुळे यंदा ही गटबाजी अशीच राहिली तर त्याचा मोठा फटका हा लोकसभा आणि पुढे विधानसभा निवडणूकीत बसणार आहे. त्यामुळे ही गटबाजी मिटविण्याचा नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत असलेली गटबाजी पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी तालुक्यातील जाहीर सभेत नेत्यांना याबाबत फटकारले व गटबाजी खपवून घेणार नाही, असे ठणकावून सांगितले. मात्र, तालुक्यातीलच वरिष्ठ नेत्यांनी अभय दिल्याने गावपातळीवर गटबाजी जोर धरत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, तालुक्यात पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाला गटबाजीने ग्रासले आहे. पत्रिकेवर नाव टाकण्यापासून जाहीर सभेत एकमेकांचे नाव न घेण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला आहे.>घोलप गटाची भूमिका महत्त्वाचीतालुक्यात छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप व बाळासाहेब घोलप यांच्या गटाची भूमिका निर्णायक ठरली आहे २००९ व २०१४ ला या गटाने निर्णायक भूमिका घेतल्याने सत्ता राखण्यात व सत्तांतर करण्यात यश आले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे अविनाश घोलप यांचे चिरंजीव करणसिंह घोलप यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंचायत समिती निवडणूक लढवून सभापतिपद मिळवले आहे. मात्र, अविनाश घोलप यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहणे पसंद केले आहे त्यांचे बंधू बाळासाहेब घोलप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून छत्रपती कारखान्याची अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे. मागील काही महिन्यांत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी पक्षात राहणे पसंत केले; त्यामुळे या गटाची भूमिका महत्त्वाची निर्णायक ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९