शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद नव्हे, 'या' जिल्ह्याला संभाजी महाराजांचं नाव द्या; प्रकाश आंबेडकरांची मागणी

By कुणाल गवाणकर | Updated: January 4, 2021 20:27 IST

औरंगाबाद शहराला ऐतिहासिक महत्त्व, ते तसंच कायम राहावं; प्रकाश आंबेडकरांची भूमिका

मुंबई: औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर असं करण्यासाठी शिवसेनेनं पावलं उचलताच त्याला सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसकडूनच विरोध झाला. महाविकास आघाडी सरकारमधील या मतभेदांवरून भाजपनं शिवसेनेला लक्ष्य केलं. औरंगाबादचं नाव बदलण्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या सगळ्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.औरंगाबाद नव्हे, तर पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली. यावेळी त्यांनी दोन्ही जिल्ह्याला असलेल्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ दिला. औरंगाबादचं नाव बदलून ते संभाजी नगर करण्यास प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप नोंदवला. 'औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्यायला हवं. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघलांच्या काळात औरंगाबाद दुसरी राजधानी होती. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व कायम राहायला हवं,' असं आंबेडकर म्हणाले.पुणे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं असलेलं नातंदेखील त्यांनी उलगडून सांगितलं. 'औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा थेट असा फारसा संबंध नाही. उलट संभाजी महाराज आणि पुण्याचं नातं आहे. पुणे जिल्ह्यात संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचं स्मरण राहावं, असं वाटत असेल तर योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचं  नाव दिलं तर अधिक संयुक्तिक होईल,' असं त्यांना सांगितलं. पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजपा-शिवसेनेनं औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना