"अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालोय, हिंमत असेल तर रोखून दाखवा"

By बाळकृष्ण परब | Published: November 9, 2020 11:47 AM2020-11-09T11:47:34+5:302020-11-09T11:52:42+5:30

Ram Kadam News : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेविरोधात एक दिवसाचे उपोषण आणि सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालत आंदोलन केल्यानंतर राम कदम यांनी आज थेट अर्णब गोस्वामींची भेट घेण्यासाठी तळोजा कारागृहाच्या दिशेने कूच केली आहे.

"I'M going to Taloja Jail to meet Arnab Goswami. If you have the courage, stop me." - Ram Kadam | "अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालोय, हिंमत असेल तर रोखून दाखवा"

"अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालोय, हिंमत असेल तर रोखून दाखवा"

Next
ठळक मुद्देअर्णब गोस्वामी यांच्या जीविताला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीही माफ करणार नाहीमी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालो आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा

मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आलेले आहेत. गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान भाजपा आमदारा राम कदम यांनी पोलिस आणि राज्य सरकारला दिले आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेविरोधात एक दिवसाचे उपोषण आणि सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालत आंदोलन केल्यानंतर राम कदम यांनी आज थेट अर्णब गोस्वामींची भेट घेण्यासाठी तळोजा कारागृहाच्या दिशेने कूच केली आहे.

दरम्यान, तळोजाला निघण्यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये राम कदम म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीही माफ करणार नाही. तुम्ही जबरदस्तीने आणीबाणी लादली आहे. आता मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालो आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान राम कदम यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना दिले आहे.



अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी
अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची रविवारी अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. तिथून त्यांना रायगडमध्ये नेण्यात आले होते. तिथे न्यायालयात हजर केले असतान त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. अटकेत असताना मला मारहाण करण्यात आली. मला माझ्या वकिलांसोबत बोलू दिले जात नाही आहे, असा आरोप रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केला  होता.

Web Title: "I'M going to Taloja Jail to meet Arnab Goswami. If you have the courage, stop me." - Ram Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.