शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सच्चाई ऐकण्याची हिंमत असेल तर समोरासमोर या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 6:42 AM

५२६ कोटींचे राफेल विमान १६०० कोटींना का घेतले, असा थेट प्रश्न मी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला होता.

नांदेड : ५२६ कोटींचे राफेल विमान १६०० कोटींना का घेतले, असा थेट प्रश्न मी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला होता. त्यांनी दीड तास भाषण केले; मात्र राफेलसह एकाही प्रश्नाचे उत्तर ते देवू शकले नाहीत. एवढेच कशाला दीड तासात डोळ्यात डोळे घालून ते बोलू शकले नाहीत. माझे नरेंद्र मोदींना आताही थेट आव्हान आहे. सच्चाई ऐकण्याची हिंमत असेल, तर रेसकोर्ससह कुठल्याही ठिकाणी त्यांनी माझ्यासोबत चर्चेसाठी १५ मिनिटे समोरासमोर यावे. संपूर्ण देशासमोर त्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही, असे थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.नांदेड येथे आयोजित विराट प्रचार सभेत ते बोलत होते. मंचावर काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण (नांदेड), सुभाष वानखेडे (हिंगोली) मच्छिंद्र कामंत (लातूर) यांच्यासह मुकुल वासनिक, मधुसुदन मिस्त्री, संपत कुमार, माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, कमलकिशोर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होेती. खा. गांधी यांनी भाषणात भाजपवर जोरदार हल्ला चढवित प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, विचारलेल्या प्रश्नांपासून मोदी पळ काढत आहेत. एवढेच कशाला प्रसार माध्यमांसमोर येऊन बोलण्याचे धाडसही त्यांच्यात नाही. कारण गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराशिवाय त्यांनी काहीच केले नसल्याची टीका राहुल यांनी केली.

ते म्हणाले, नोटाबंदी आणि गब्बरसिंग टॅक्समुळे आज करोडो लोक बेरोजगार झाले आहेत. मोदींच्या या मनमानी कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली असून, मागील ४५ वर्षांत सर्वाधिक बेरोजगारीही त्यांच्याच काळात नोंदविली गेली आहे. मोदींनी देशासमोर येऊन यासाठी जाहीर माफी मागितली पाहिजे. मी पंतप्रधान नाही तर चौकीदार आहे असे मोदी ओरडत आहेत. हे खरे आहे. मागील पाच वर्षांत मोदींनी केवळ अनिल अंबानींचीच चौकीदारी केली आहे. मोदींना आता पंतप्रधान करु नका तर त्यांना चौकीदार म्हणूनच ठेवा, असे आवाहन राहुल यांनी केले. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. मोदींनी लोकांच्या खिशातील पैसे काढून घेतले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल खरेदी बंद केली. पर्यायाने कारखाने बंद झाले आणि त्यातून बेरोजगारी वाढली. यावर मात करण्यासाठी आम्ही आता देशातील आर्थिक दुर्बल ५ कोटी लोकांच्या खात्यावर दरवर्षी ७२ हजार रुपये टाकणार असून याचा फायदा देशातील २५ कोटी लोकांना होईल, असे राहुल यांनी स्पष्ट केले.
मोदींकडून १५ लाखांची फसवणूक, आमची ३ लाख ६० हजारांची हमीकाँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशातील गरिबांसाठी न्याय योजना जाहीर केली आहे. मोदींनी प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकण्याची घोषणा केली होती. या घोषणेसारखी न्याय योजनेची घोषणा फसवणूक करणारी नाहीे. मोदींनी १५ उद्योगपतींचे हजारो कोटी रुपये माफ केले. तुम्ही उद्योगपतींचे कर्ज माफ करु शकता? मग देशातील इमानदार नागरिकांना दिलासा का देवू शकत नाही? न्याय योजनेच्या अनुषंगाने मी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा केली. जागतिक स्तरावरच्या अर्थतज्ज्ञांचेही सल्ले घेतले. त्यानंतरच दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ शकतो हे ठरविले. म्हणजेच गरिबाला पाच वर्षांत ३ लाख ६० हजार रुपये दिले जातील. ही केवळ घोषणा नाही तर न्याय योजनेच्या अंमलबजावणीची तुम्हाला मी गॅरंटी देतो, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी विश्वास दिला.महाराष्टÑाच्या डीएनएमध्ये काँग्रेसमहाराष्टÑाचा इतिहास सहिष्णुतेचा आणि बंधुभावाचा आहे. या प्रदेशाने नेहमी सद्भावनेचा, प्रेमाचा संदेश दिला आहे. या राज्याने कधीही द्वेषाचा आधार घेतला नाही. येणारे सरकार हे एका व्यक्तीचे असणार नाही तर पूर्ण भारतीयांचे असेल. असे सांगत महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्टÑवादीच्या विजयाबाबत मी निश्चिंत आहे. कारण महाराष्टÑाच्या डीएनएमध्येच काँग्रेस असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.>राहूल गांधी यांनीमोदींना केलेले प्रश्नमागील निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचा शब्द दिला होता. या निवडणुकीत जाहीरनाम्यातून रोजगाराचा मुद्दाच भाजपने वगळला आहे. भाजपने असे का केले?५२६ कोटींचे राफेल विमान१६०० कोटींना खरेदी करीत आहात. हिंदुस्थान एरोनॅटिक लि. ही कंपनी भारतात दर्जेदार विमानाचे उत्पादन करु शकते. मात्र त्यानंतरही विमान बनविण्याचा कसलाही अनुभव नसताना अनिल अंबानींच्या कंपनीला विमानाचे कंत्राट द्या, असे फ्रान्सच्या राष्टÑपतींना का सांगितले?५० हजार रुपये उत्पन्न असलेल्याअमित शहा यांच्या पुत्राने महिन्यात८० कोटी कुठून मिळविले?अरुण जेटली यांच्या मुलीच्या खात्यावर मेहुल चोक्सी यानेपैसे का टाकले?नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदीया सर्व चोरांची नावे मोदीच का आहेत?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRafale Dealराफेल डील