शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

'त्यांचा' स्वबळाग्रह 'शेवटपर्यंत' टिकला तर सेना-राष्ट्रवादी एकत्र : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 2:02 PM

NCP's Jayant Patil on Congress : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात गुरुवारी तुळजाभवानीच्या द्वारातून करण्यात आली.

ठळक मुद्देराज्यात अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्ते, नेते राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष समजूतदार आहेत. आम्ही एकत्रच राहू.

उस्मानाबाद : आम्ही तिन्ही पक्ष एकत्रच राहू. जर त्यांचा आग्रहच असेल स्वबळावर लढण्याचा आणि तो 'शेवटपर्यंत' टिकला तर किमान राष्ट्रवादी व शिवसेना तरी एकत्रच लढेल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी काँग्रेसला लगावला. ( If their 'self-determination' lasts till the end, then Sena-NCP fight together )

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात गुरुवारी तुळजाभवानीच्या द्वारातून करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी तुळजाभवानी देवीचे द्वारातून दर्शन घेत यात्रेला सुरुवात केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या घटकांना उमेद मिळू दे, पाऊस चांगला होऊ दे, असे साकडे तुळजाभवानी देवीला घालून मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात केली आहे. ही यात्रा म्हणजे स्वबळाची चाचपणी नव्हे तर पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष समजूतदार आहेत. आम्ही एकत्रच राहू. काँग्रेसही आमच्यासोबतच राहील, अशी मला खात्री वाटते.

गयारामांचे आयाराम कोरोनानंतरच...राज्यात अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्ते, नेते राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, कोरोनामुळे हे प्रवेश थांबले आहेत. जाहीर कार्यक्रम घेता येत नसल्याने कोरोना गेल्यानंतरच प्रवेश सुरु होतील. आमचे प्राधान्य बेरजेचे राजकारण करण्यास असले तरी जे पक्ष सोडून गेले होते त्यांच्याबाबतीत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलOsmanabadउस्मानाबादShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस