शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘’तो अहवाल प्रसिद्ध होताक्षणी ठाकरे सरकार पडणार’’ भाजपाच्या बड्या नेत्याचा दावा

By बाळकृष्ण परब | Updated: November 7, 2020 13:15 IST

Uddhav Thackeray News : अर्णव गोस्वामींना झालेल्या अटकेवरून सध्या शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका बड्या नेत्याने पुन्हा एकदा ठाकरे सरकारबाबत मोठा दावा केला आहे.

ठळक मुद्दे एनएन वोहरा समितीने दिलेला अहवाल प्रसिद्ध केल्यास लगेचच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पडेल या अहवालामध्ये दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगारांशी राजकीय नेत्यांच्या आणि नोकरशहांच्या असलेल्या संबंधांबाबत खळबळजनक माहिती होती१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर नरसिंहराव सरकारने एनएन वोहरा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती

नवी दिल्ली - राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये सध्या कमालीची कटुता आलेली आहे. अर्णव गोस्वामींना झालेल्या अटकेवरून दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका बड्या नेत्याने पुन्हा एकदा ठाकरे सरकारबाबत मोठा दावा केला आहे. माजी पंतप्रधान नरसिंहा राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्थापन केलेल्या एनएन वोहरा समितीने दिलेला अहवाल प्रसिद्ध केल्यास लगेचच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पडेल असा दावा भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांनी केला आहे. तसेच हा अहवाल तातडीने प्रसिद्ध केला जावा, अशी मागणी उपाध्याय यांनी केली आहे.एनएन वोहरा यांच्या नेतृत्वाखालील समितीने एक १०० पानांचा अहवाल तयार केला होता. त्या अहवालामध्ये दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगारांशी राजकीय नेत्यांच्या आणि नोकरशहांच्या असलेल्या संबंधांबाबत खळबळजनक माहिती होती. या अहवालातील केवळ १२ पानेच प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, या नेत्यांची माहिती कधी प्रसिद्ध केली जाईल, अशी विचारणा उपाध्याय यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पीएमओला टॅग करत उपाध्याय यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाने वोहरा समितीच्या अहवालावर कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारला दिली होती. मात्र २३ वर्षे होत आली तरी आतापर्यंत वोहरा समितीच्या अहवालावर कुठलीही कारवाई झाली नाही. तसेच हा अहवाल सार्वजनिकही करण्यात आलेला नाही.

काय आहे वोहरा समितीचा अहवाल१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर नरसिंहराव सरकारने एनएन वोहरा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. या समितीचे अध्यक्षपद तत्कालीन गृहसचिव एनएन वोहरा यांच्याकडे होते. तसेच या समितीमध्ये रॉ आणि आयबीचे सचिव, सीबीआयचे संचालक आणि गृहमंत्रालयाच्या सचिवांचाही समावेश होता. अनेक नेते आणि नोकरशहांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याची खळबळजनक माहिती या अहवालातून सरकारला देण्यात आली होती. हा अहवाल पूर्णपे प्रसिद्ध करण्यात आला नाही. मात्र १९९५ मध्ये १०० पानी अहलवालामधील १२ पाने प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामधून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मोठे अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधांबाबत सूतोवाच करण्यात आले होते.

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण