शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

...तर मंत्री जयंत पाटील आज भाजपत असते, नारायण राणेंचा खळबळजनक दावा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 30, 2020 21:56 IST

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशासंदर्भात बोलताना नारायण राणे यांनी हा गौप्यस्फो केला. यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरू झाली आहे.

रत्नागिरी - भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नसते, तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशासंदर्भात बोलताना नारायण राणे यांनी हा गौप्यस्फो केला. यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरू झाली आहे.

पत्रकारांशी बोलताना एका प्रश्नावर राणे म्हणाले, जयंत पाटील या आणि पुढची पाच वर्षेही आपणच मंत्री असू, असं म्हणाले असतील. कारण, आता भाजपचे सरकार असते तर जयंत पाटील मंत्री असते. तशी तयारीही त्यांनी दर्शवली होती. एढेच नाही, तर भाजपमध्ये येण्यासंदर्भात त्यांची बोलणीही भाजपच्या नेत्यांशी झाली होती. काही गोष्टींसाठी ते थांबले होते. अन्यथा ते आज भाजपमध्ये असते, असा दावा राणे यांनी केला आहे. याच बरोबर जयंत पाटील हे माझ्यासंदर्भातही बोलले आहेत. मात्र, मी त्यांचा समाचार इस्लामपुरात जाऊन घेईन, असा इशाराही राणे यांनी पाटलांना दिला आहे. 

अपयशी सरकार -यावेळी महाविकास आघाडीवर बोलताना राणे म्हणाले, सरकार या वर्षात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या सरकारने जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? असा सवालही राणे यांनी यावेळी केला. तसेच, राज्यात केवळ दडपशाही सुरू आहे. सुशांतचा खून झाला. मात्र, मंत्र्यांना वाचविण्यासाठी, ती आत्महत्या असल्याचे हे सरकार दाखवत आहे, असा गंभीर आरोपही राणे यांनी राज्य सरकारवर केला यावेळी केला.

कोरोनाच्या नावाखाली ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार-नारायण राणे - कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आपल्या सरकारने वर्षपूर्ती केल्याची मुलाखत देताना त्यांनी वर्षभरात सरकारने काय ठोस केले, याची माहितीही देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी काही केलेलेच नाही. कोरोनावरील उपाययोजनांसाठी सरकारने १२ हजार कोटी खर्च केल्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्यातील असंख्य कामे आपल्याच नातेवाईकांना देऊन सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

हक्काचे 16 टक्के आरक्षण हवे - मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना राणे म्हणाले, आम्हाला कोणतीही तडजोड नको. कुणाच्या वाट्याचेही आरक्षण नको. आम्हाला केवळ आमच्या हक्काचे 16 टक्के आरक्षण हवे आहे. असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा