शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

"मला ज्यावेळेस वाटेल तेव्हा पवारांना भेटेन, कोणाच्या परवानगीची गरज नाही", एकनाथ खडसेंचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 20:58 IST

Eknath Khadse News : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत असतानाच बुधवारी मुंबई येथे शरद पवार व खडसे यांची भेट होणार अशीही जोरदार चर्चा सुरू झाली.

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत असतानाच बुधवारी मुंबई येथे शरद पवार व खडसे यांची भेट होणार अशीही जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र खडसे यांच्या भेटी संदर्भात आपले नियोजन नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले‌.  त्यानंतर खडसे यांनीही भेट झाली नसल्याचे सांगत 'मला ज्यावेळेस वाटेल तेव्हा भेटेन, मला कोणाच्या परवानगीची गरज नाही' अशी प्रतिक्रिया खडसे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच बुधवारी खडसे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. ही भेट होणार असण्या संदर्भात अधिकृत दुजोरा मिळाला नाही, तरी याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.मात्र यासंदर्भात खडसे यांनी आपण उपचारासाठी मुंबईत आलो असल्याचे सांगत भेटीचा विषयी बोलणे टाळले होते तसेच शरद पवार यांनीही खडसे यांच्या भेटी संदर्भात नियोजन नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले शरद पवार यांनी जे सांगितले त्यामुळे विषय संपला. आता उद्या असो की केव्हा असो मला ज्या वेळेस भेट घ्यायची असेल त्यावेळी मी भेट घेईल.  यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज राहणार नाही, असेही स्पष्ट केले.

आपल्याला पक्षाकडून अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजप नेतृत्वावर टीका करत आहेत. त्यांनी अलीकडे आपल्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे.गेल्या पंधरवड्यात मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी खडसेंना प्रवेश देण्याबाबत आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांसोबत चाचपणी देखील केली होती. त्यात स्थानिक नेत्यांनी संमिश्र मते मांडत खडसेंबाबत पक्षाला फायदाच होण्यार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीत खडसेंच्या प्रवेशाबाबत अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.  जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात देखील खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेनंतर मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत.

खडसे मुंबईत, जळगावात राष्ट्रवादीच्या गीतासोबत फोटो व्हायरल

 भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे  आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून नाराज असून सध्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. जळगावात या विषयाबाबत वातावरण निर्मितीदेखील सुरू आहे. खडसे हे मुंबईत असताना बुधवारी दुपारनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात खडसेंचा फोटो असून, राष्ट्रवादीचे गीत त्यात वापरले आहे. या व्हिडिओची चर्चा होत आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बुधवारी खडसे हे मुंबईत असल्याने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार असल्याचेही सांगितले जात होते. एकीकडे या साऱ्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे जळगावातही खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत वातावरण निर्मिती सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी दुपारनंतर जळगावात खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हाट्सएपच्या अनेक राजकीय ग्रुपमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला. गतकाळात झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले पक्षाचे गीत या व्हिडिओत ध्वनिमुद्रित केलेले असून त्यात खडसेंची प्रसन्न भावमुद्रा असलेला एक फोटोही जोडलेला आहे. या व्हिडिओने एकच खळबळ पुढारी असून त्याची चर्चा होत आहे. 

दरम्यान, हा व्हिडीओ कुणी बनवला, कुणी व्हायरल केला, याची मात्र कोणत्याही प्रकारची खात्रीशीर माहिती नाही.एकनाथराव खडसे यांनी मात्र राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेले नाही. मुंबईत आपण उपचारासाठी आल्याचे त्यांनी सांगितले आहे.  गुरुवारी मुंबईत होणाऱ्या भाजपच्या बैठकीला ते उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले जात आहे. परंतु, याबाबत खात्रीशीर माहिती नाही.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस