शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

काँग्रेस अन् मित्रपक्षांची कृती लोकशाहीसाठी लज्जास्पद; गोस्वामींवरील कारवाईवरून अमित शहांचा घणाघात

By कुणाल गवाणकर | Updated: November 4, 2020 15:15 IST

Arnab Goswami Arrested: अमित शहांची महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका

नवी दिल्ली: रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींना आज सकाळी रायगड पोलिसांनी अटक केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातल्या भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील राज्य सरकारच्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकारची कारवाई आणीबाणीची आठवण करून देणारी असल्याचं शहांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.'काँग्रेसचे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली. रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात सत्तेचा गैरवापर करून झालेली कारवाई व्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाहीवरीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. यामुळे मला आणीबाणीची आठवण येते. माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील या हल्ल्याचा निषेध व्हायला हवा आणि तो होईलच,' अशा शब्दांत शहांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.''गृहमंत्री अमित शहांनी माहिती घेऊन बोलावं''अमित शहांच्या महाविकास आघाडी सरकारवरील टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अर्णब गोस्वामींच्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी संबंध काय?, असा थेट सवाल सावंत यांनी विचारला आहे. एका व्यवसायिकेचे पैसे बुडवल्यानं आणि त्या व्यवसायिकानं आत्महत्या केल्यानं गोस्वामींना अटक झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आधी माहिती घ्यावी आणि मग बोलावं, असं सावंत यांनी म्हटलं आहे."गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?"अनिल परब यांच्याकडूनही भाजपचा समाचाररिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी अन्वय नाईक नावाच्या एका व्यवसायिकाचे पैसे बुडवले. त्यामुळे नाईक यांनी आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली. म्हणून गोस्वामींना अटक झाली आहे, असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडताहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.अन्वय नाईक कोण होते?, त्यांची आत्महत्या आणि अर्णब गोस्वामींचं कनेक्शन काय?... वाचाअर्णब गोस्वामींनी नाईक यांचे पैसे बुडवले. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक समस्येतून त्यांनी आत्महत्या केली. एका मराठी भगिनीचं कुंकू गोस्वामींमुळे पुसलं गेलं. या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही. मग भाजप नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करताहेत? गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का?, असे प्रश्न परब यांनी विचारले आहेत. अन्वय नाईक यांनी गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या केली. भाजप नेते अशा गोस्वामींच्या बाजूनं आहेत का? असतील तर तसं त्यांनी जाहीर करावं, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRepublic TVरिपब्लिक टीव्हीAmit Shahअमित शहाAnil Parabअनिल परबArvind Sawantअरविंद सावंत