शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पुन्हा शिवसेनेसोबत युती करणार का?; अमित शहांनी स्पष्टच सांगितलं

By कुणाल गवाणकर | Published: October 18, 2020 11:04 AM

Amit Shah Shiv Sena Bjp Alliance: शिवसेना-भाजपमधील ताणलेल्या संबंधांवर शहांचं भाष्य

मुंबई: मंदिरं, रामलीला, मदरसे यावरून भाजपनं सध्या ठाकरे सरकारविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्यानं सुरू आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंना पत्र लिहून सेक्युलर शब्दावरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. या संबंधांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केलं. राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवलेल्या 'त्या' पत्रावर अमित शहा नाराज; म्हणाले...शिवसेना, अकाली दलानं भाजपची साथ सोडली. शिवसेना गेल्या वर्षी भाजपची साथ सोडली. तर अकाली दलानं कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून एनडीएला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना आणि अकाली दल भाजपचे जुने मित्र पक्ष होते. त्यांनी भाजपशी फारकत घेतल्यानं भाजपप्रणित एनडीएला धक्का बसला. त्यावर अमित शहांनी 'नेटवर्क१८' ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. 'एनडीएमध्ये आजही ३० पेक्षा जास्त पक्ष आहेत. शिवसेना आणि अकाली दलानं भाजपची साथ सोडली. आम्ही त्यांची साथ सोडली नाही,' असं शहा म्हणाले.आज देशात हिंदुत्ववाद्यांचं राज्य; पण धर्माचं राज्य आहे काय?; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणाशिवसेना, अकाली दलासोबत पुन्हा हातमिळवणी करणार का, त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे खुले आहेत का, असे प्रश्न शहांना विचारण्यात आले. त्यावर 'मी काही ज्योतिषी नाही. पण सध्या तरी ते (अकाली दल) कृषी विधेयकांवर अडून राहिले आहेत. शिवसेना आणि अकाली दलाला आम्ही एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. ते स्वत:च एनडीएमधून बाहेर पडले. त्याला आम्ही काय करू शकतो?,' असं शहा यांनी म्हटलं.कोश्यारी-ठाकरे खडाजंगी! धार्मिक स्थळे उघडण्यावरून राजभवन व ‘मातोश्री’त जोरदार पत्रोपत्रीराज्यपाल कोश्यारींच्या पत्राबद्दल नाराजीभगतसिंह कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं खुली करण्याच्या मागणीसंदर्भात एक पत्र लिहिलं. त्यात कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना रामभक्तीची आठवण करून दिली. 'मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच तुम्ही अयोध्येचा दौरा केला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा केली होती,' असं कोश्यारींनी पत्रात म्हटलं. तुम्ही स्वत:ला रामभक्त, हिंदुत्ववादी म्हणवता. मग आता तुम्हाला मंदिरं खुली करण्यासाठी काही दैवी संकेत मिळत आहेत का, असा खोचक प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केला. तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिटकारा होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?, असाही प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात वापरलेल्या शब्दांवर अनेकांनी आक्षेप नोंदवला. गृहमंत्री अमित शहांनीदेखील राज्यपालांच्या पत्रातील मजकूराबद्दल नाराजी व्यक्त केली. 'राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र मी वाचलं. त्यांनी भाषणात काही संदर्भ दिले. पण त्यांनी काही शब्दांची निवड केली नसती, तर बरं झालं असतं, असं मलादेखील वाटतं. राज्यपालांनी ते विशेष शब्द वापरायला नको होते. त्या शब्दांची निवड टाळायला हवी होती,' असं शहा म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी