आज देशात हिंदुत्ववाद्यांचं राज्य; पण धर्माचं राज्य आहे काय?; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Published: October 18, 2020 08:25 AM2020-10-18T08:25:45+5:302020-10-18T08:31:33+5:30

Sanjay Raut Bhagat SIngh Koshyari: संजय राऊत यांचं मोदी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र

shiv sena mp sanjay raut hits out at modi government over politicizing governors office | आज देशात हिंदुत्ववाद्यांचं राज्य; पण धर्माचं राज्य आहे काय?; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

आज देशात हिंदुत्ववाद्यांचं राज्य; पण धर्माचं राज्य आहे काय?; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

googlenewsNext

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मंदिरं उघडण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण यासह अनेक मुद्द्यांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचे प्राबल्य वाढते तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो, असे परमेश्वराने अभिवचन दिलेले आहे. हे सगळय़ांनाच माहीत आहे. परंतु ते अभिवचन या कलियुगात कधी खरे होणार? आज देशात हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे, पण धर्माचे राज्य आहे काय?, असा सवाल राऊत यांनी 'रोखठोक'मधून उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर बलात्कार आणि हत्या झाली. ते सर्व प्रकरण आधी मीडियाने, राजकारण्यांनी वणव्यासारखे पेटवले. आता ते त्यांनीच शांत केले. पालघर येथे दोन साधूंचे हत्याकांड जमावाने केले. त्यावर देशात वादळ उठवण्यात आले. पण गेल्या चारेक दिवसांत उत्तर प्रदेशात चार साधू व राजस्थानात एका पुजाऱयाची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. राजस्थानात तर पुजाऱयास जिवंत जाळले. जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात मीडिया आहे. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला तेव्हा तो अधर्म, पण इतरत्र तो होतो तेव्हा नेहमीची घटना हे कसे शक्य आहे? व अशा वेळी परमेश्वर कुठे असतो?, असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवलेल्या 'त्या' पत्रावर अमित शहा नाराज; म्हणाले...

संजय राऊत यांच्या लेखातील महत्त्वाचे मुद्दे-
- जेथे भाजपचे राज्य नाही तेथे अधर्म सुरू आहे असा प्रोपोगंडा सुरूच आहे व जे भाजपला हवे असलेल्या धर्माचे राज्य आणण्यास विरोध करतील त्यांना लगेच निपटवून टाकायला हवे असे काही प्रमुख लोकांना वाटते. प. बंगालात एका भाजपा पदाधिकाऱयाची हत्या झाली हे दुर्दैव पण त्याविरोधांत हजारो भाजप कार्यकर्त्यांना जमवून कोलकात्यातील मंत्रालयावर चाल करण्यात आली. यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्याचा राजकीय फायदा विधानसभा निवडणुकांत घेता येईल हे भाजपचे राजकीय धोरण ठीक, पण प. बंगाल हा हिंदुस्थानचाच एक भाग आहे हे केंद्राला विसरता येणार नाही.

संजय राऊत म्हणतात, देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे....

- महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारही डोळय़ांत खुपते व सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना देशविरोधी वाटतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार डिसेंबरपर्यंत बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लादली जाईल, असे भविष्य श्री. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवून ठेवले. त्याआधी प्रमुख नेत्यांना 'निपट डालो' हे धोरण अमलात आणायचे. मुळात दिल्लीतील राज्यकर्त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकार स्थापन होणे हे काही घटनाविरोधी नाही, पण जेथे आपल्या विरोधी सरकारे आहेत त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा व राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे हे धोरण चांगल्या राज्यकर्त्यास शोभत नाही. 

"मोदी, शहा ‘निपटा दो’ मानसिकतेचे; केंद्राची भूमिका सहकार्याची असावी"

- प. बंगालात राज्यपाल धनखर हे ममता बॅनर्जींविरोधात रोज नवी आघाडी उभारत आहेत. ममता बॅनर्जीही लढाईत मागे हटत नाहीत. दिल्लीत केजरीवाल विरुद्ध राज्यपाल झगडा आहेच. पंजाबातील लढवय्या शीख समाज अंगावर उसळला तर गडबड होईल म्हणून तेथे कुणाची हिंमत होत नाही. महाराष्ट्रात राज्यपालांनी प्रयत्न करूनही 'ठाकरे सरकार' स्थिर आहे. राजस्थानात अशोक गेहलोत यांचे सरकार अस्थिर करण्याचे सर्व प्रयत्न फसले हे सत्य आहे.

मंदिर खुली करण्यावरुन राजकारण तापलं, संजय राऊतांचा राज्यपालांना सल्ला

- महाराष्ट्रापेक्षा गंभीर प्रश्न गुजरात, हरयाणासारख्या राज्यांत निर्माण झाले. गुजरातमध्येही सोमनाथ, अक्षरधामसारखी मंदिरे बंद आहेत; पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खोडसाळ पत्र लिहिले. शेवटी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी 'ठाकरे' आहेत याचा विसर त्यांना पडला व पुढचे महाभारत घडले. एकछत्री अंमल गाजवण्यासाठी जे आडवे येतील त्यांना मिळेल त्या हत्याराने दूर करा. हे एक आणीबाणीसदृश्य धोरण राबवले जात आहे. 

- महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले, शरद पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळय़ांना 'निपट डालो' हा नवा अजेंडा राबवायचा. सुशांत प्रकरणात शिवसेनेच्या युवा नेत्यांना निपटण्याचे प्रयत्न झाले ते त्यांच्यावरच उलटले. काही झाले तरी सत्ता हवी व त्यासाठी कोणत्याही थराला जायचे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी यांचा वापर करायचा. हे तर रशिया, चीनपेक्षा भयंकर चालले आहे. बिहार निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनाच निपटले जाईल अशी स्थिती आहे. बिहारात चिराग पासवान यांच्या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवायचे ठरवले त्यामागे सूत्र हेच आहे.

Web Title: shiv sena mp sanjay raut hits out at modi government over politicizing governors office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.