शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

अखेर हिमंत बिस्वा सरमा होणार आसामचे मुख्यमंत्रीपदी, उद्या घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 2:04 PM

himanta biswa sarma : मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हिमंत बिस्वा सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत तात्काळ मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देनरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, उद्या म्हणजेच सोमवारी हिंमत बिस्वा सरमा हे मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील.

गुवाहटी : अखेर आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज झालेल्या भाजपाच्या विधीमंडळ दलाच्या बैठकीत हिमंत बिस्वा सरमा यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली. तसेच, आसामचे निरीक्षक म्हणून पाठविण्यात आलेले केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, उद्या म्हणजेच सोमवारी हिंमत बिस्वा सरमा हे मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील. (himanta biswa sarma will be the new chief minister of assam)

आज सकाळी 11 वाजता दिसपूर येथे भाजपाच्या विधीमंडळ दलाची बैठक पार पडली. या बैठकीला बीएल संतोष, बैजयंत जय पांडा आणि अजय जम्वाल आदी नेतेही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हिमंत बिस्वा सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत तात्काळ मंजूर करण्यात आला. त्यामुळे सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, भाजपाच्या विधीमंडळ दलाच्या बैठकीपूर्वी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. हिमंत बिस्वा शर्मा आज संध्याकाळी राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेणार असून सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते.

दरम्यान, आसाममध्ये भाजपाने पुन्हा सत्ता राखली आहे. मात्र,  भाजपाने विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा या दोन्ही नेत्यांपैकी कोणाचेही नाव जाहीर केले नव्हते. त्यामुळे हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. अखेर नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी सर्बानंद सोनोवाल आणि हिमंत बिस्वा सरमा यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी दिल्लीत बोलविले होते. यावेळी आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून हिंमत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

(पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा का हरले?, 'रोखठोक'मधून संजय राऊतांनी सांगितलं कारण)

हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता2016 मध्ये हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, 2016च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपाने सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. पण, आता परिस्थिती बदलली आहे. बिस्वा सरमा यांनी केवळ आसामच्या पूर्वेकडील भागातच नव्हे तर संपूर्ण आसाममध्ये भाजपाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत भाजपाकडून आसामचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

("आदित्य ठाकरेंची मंत्रिपदी नियुक्ती केली, त्याचप्रमाणे...", गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र)

कोण आहेत हिमंत बिस्वा सरमा?हिमंत बिस्वा सरमा यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने 15 मे 2001 पासून सुरू झाली. त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात प्रॅक्टिस केली आहे. 1996 ते 2005 पर्यंत त्यांनी वकील म्हणून काम पाहिलं आहे. 1 फेब्रुवारी 1969मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कैलाशनाथ सरमा हे साहित्यिक होते. त्यांची आई आसाम साहित्य संस्थांशी संबंधित आहे. सरमा यांनी कामरुपमध्ये अकादमी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर गुवाहाटीतून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आहे. विज्ञान विषयात त्यांनी पदवी आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतले. राजकारणात असतानाच त्यांनी पीएचडीही केली.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपा