शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 05:31 IST

राज्यभरातील नऊ हजार एसटी कर्मचाऱ्यांना काेराेना झाला. पैकी २४५ जणांचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच महामंडळाने प्रदान केले

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २४५ कोरोना योद्ध्यांचे बळी गेले. यातील केवळ नऊ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित २३६ कुटुंबांना मदतीसाठी आणखी ११८ कोटी रुपयांची गरज आहे. या निधीसाठी परिवहन मंत्र्यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्र्यांना साकडे घातले. आता मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी निधीचा हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला आहे.

राज्यभरातील नऊ हजार एसटी कर्मचाऱ्यांना काेराेना झाला. पैकी २४५ जणांचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच महामंडळाने प्रदान केले. मात्र, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला विम्याची मदत देण्यासाठी पैसे नाहीत, ही वास्तविकता आहे.मृत फक्त नऊ जणांच्या  कुटुंबांना मदत मिळाली. दोन कुटुंबांना मदतीचे प्रस्ताव तयार झाले, प्रत्यक्षात मात्र त्यांना अद्यापही मदत मिळालेली नसल्याचे समाेर आले आहे. मृतांच्या  कुटुंबास मदत देण्यास हातभार लावावा, अशी मागणी एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना केली आहे. परंतु, अद्याप विभागाने  यावर काेणतेही उत्तर दिले नसल्याचे समजते.

...त्यामुळेच ३५ कोटी सांभाळून ठेवले  प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटामागे एक रुपया कपात केला जातो. व्यक्तीच्या मृत्यूस एसटी जबाबदार असल्यास दहा लाखांची भरपाई यातून दिली जाते. त्यामुळे शिल्लक असलेले ३५ कोटी रुपये सांभाळून ठेवले जात आहेत. परिवहन मंत्र्यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्यात येईल. त्यांनी सूचना केल्यास एसटी महामंडळाला मदतीचा हात देता येईल.- विजय वडेट्टीवार,  मदत व पुनर्वसन मंत्री 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेstate transportएसटीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार