शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:50 IST

Dhananjay Munde on Sharad Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकेचे बाण डागले. माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला. 

Dhananjay Munde Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले नेते शरद पवारांच्या रडारवर आहेत. 'लोकमत'ला दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवारांनी जाहीरपणे धनंजय मुंडेंबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर धनंजय मुंडेंविरोधातपरळीत पवारांची काय रणनीती असणार, याबद्दल चर्चा होत असतानाच आता धनंजय मुंडेंनी पवारांवर हल्ला चढवला. 'माझे वैयक्तिक आणि राजकारणातील अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे', असे म्हणत धनंजय मुंडेंनी पवारांवर नाव घेता निशाणा साधला आहे. 

परळीतील पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी बालगंधर्व रंगमंदिरात स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडेंनी शरद पवारांना नामोल्लेख न करता लक्ष्य केले. 

धनंजय मुंडे काय म्हणाले?

"छोट्या पवारांची (अजित पवार) साथ दिल्यामुळे माझे व्यक्तिगत आणि सामाजिक राजकारणातील अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते आणखी प्रयत्न करत राहतील. पण, जनतेने माझ्यासोबत राहावे. मग बाकीच्या गोष्टी मी पाहून घेईन", असे धनंजय मुंडे शरद पवारांचं नाव न घेता म्हणाले. 

"मी काही कारणास्तव बाजूला गेलो, तर माझे अख्खे राजकारण संपवले जात आहे. मी कधी कोणाची जात काढली नाही. पण, माझ्यामुळे काहीजण आज जात काढत आहेत. मी कोणाला कधीच घाबरत नाही. कारण जनतेसाठी माझे काम प्रामाणिक आहे. ज्यांनी अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ", असे म्हणत धनंजय मुंडेंनी दंड थोपटले. 

कोणाशी टोकाचे वैर नाही -धनंजय मुंडे

"माझी इच्छा होती की, वकील व्हावे. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पुण्यात आलो. राज्यभरातील मित्र माझे याठिकाणी जाले. जीवनात कधी जातपात, धर्म, पंथ मला शिवले नाही. राजकारणात कधी कोणाशी टोकाचे वैर झाले नाही मी किंवा माझ्या वडिलांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे राजकारणात येऊन मोठे व्हावे ही इच्छा ठेवली नाही. मुंडे साहेबांसाठी मी राजकारणात आलो, ते माझ्यासाठी मिशन आहे", अशा असे धनंजय मुंडे म्हणाले. 

 "प्रत्येकजण राजकारणात यशस्वी होईल, ज्यावेळी राजकारण समाजसेवेसाठी करेल. आमचे संघर्षाचे राजकारण आहे. जनतेचे जोपर्यंत प्रेम माझ्यासोबत आहे, तोपर्यंत माझ्या घराबद्दल, जातीबद्दल काढले तरी काही होऊ शकत नाही", असे म्हणत धनंजय मुंडेंनी राजकीय विरोधकांना उत्तर दिले. 

मुंडेंसमोर पवार आणि जरांगेंचं आव्हान?

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार अशा नेत्यांच्या मतदारसंघात सातत्याने दौरे करत असून, यात धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात पवारांचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला, तरी एकीकडे मनोज जरांगे आणि दुसरीकडे शरद पवारांची खेळी यामुळे धनंजय मुंडेंसमोर दुहेरी आव्हान असणार अशी चर्चा आहे.  लोकसभा निवडणुकीतही बीड जिल्ह्यातील मतदारांना अशीच लढाई बघायला मिळाली होती. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवार