शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा, त्यांना एक संधी मिळाली पाहिजे’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 09:37 IST

Raj Thackeray Birthday: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं विशेष कौतुक केले आहे.

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मनसैनिकांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान, मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनीही राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं विशेष कौतुक केले आहे. त्यानिमित्त केदार शिंदे यांनी फेसबुकवर खास पोस्ट लिहून राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वामधील पैलूंचे वर्णन केले आहे. (MNS in Maharashtra Politics)

या फेसबूक पोस्टमध्ये केदार शिंदे म्हणतात की, राज ठाकरे हे राजकीय नेते म्हणून कसे आहेत? याविषयी लिहायला त्यातला मी माहीर नाही. पण एक कलावंत आणि मित्र म्हणून एका वाक्यात लिहू शकतो की, तो राजा माणूस आहे. तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणं फार अवघड आहे. संगीत, चित्रपट या दोन क्षेत्रातला  त्यांच्या तोडीचा माहितगार दुसरा कोणी मी पाहिला नाही.  मैत्री करावी तर या राजा माणसाशी. सतत लक्ष असतं त्यांचं. सतत संपर्कात असतात. 

केदार शिंदे पुढे म्हणतात की, वाढदिवस साजरा करून वय वाढत, पण राजसाहेब यंग ॲन्ड डायनॅमिक आहेत. या कोरोनाच्या कठीण परीस्थितीमध्ये हा एकमेव राजकीय नेता होता, ज्याने कितीही विरोधात असला तरी त्याची राजकीय पोळी भाजली नाही. हे आपल्याला सतत जाणवलय. मान्य करायालाच हवं. एकच वाटतं की, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात अजून तशी संधी मिळाली नाही. 

त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे. एकदम 70mm.. आपण इतक्या लोकांना संधी दिली. काहींना न देता गोळाबेरीज करून त्यांनी आपली आपणच मिळवली. एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ. नक्कीच आपल्यावर "राज्य" येणार नाही, याची ते काळजी घेतील. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे गिफ्ट येत्या निवडणुकीत मनसे मतदान करून देऊ. मला खात्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांना मनोमन मानणारे राजसाहेब आपल्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील, अशी अपेक्षाही केदार शिंदे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेKedar Shindeकेदार शिंदेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण