शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये", संजय राऊतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 21:00 IST

Sanjay Raut : केंद्राने राज्यपालांना परत बोलवावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

ठळक मुद्देसंजय राऊत यांनी देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांपासून ते अगदी शरजील उस्मानीने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही यावेळी समाचार घेतला.

नाशिक : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवायच्या १२ उमेदवारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

"राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मात्र, राज्यपाल घटनाबाह्य वागत आहेत. १२ आमदारांची नियुक्ती राजकीय नाही. राज्य सरकारने केलेल्या शिफारशी स्वीकारणे राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल त्यावर निर्णय घेत नाहीत. त्यांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये", अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्यावर निशाणा साधला. तसेच, केंद्राने राज्यपालांना परत बोलवावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

याचबरोबर, संजय राऊत यांनी देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांपासून ते अगदी शरजील उस्मानीने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही यावेळी समाचार घेतला. 'उस्मानी घाण उत्तर प्रदेश मधून आली, योगी आदित्यनाथ यांनी तिकडेच थांबवली असती तर असे घडले नसते. सध्या तो अलिगढमध्ये आहे आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी मदत करावी', असे स्पष्ट संजय राऊत यांनी मांडले.

याशिवाय, केंद्र सरकार शेतकरी आंदोलन गंभीरपणे घेत नसल्याचा आरोप करत शेतकरी हिंसक बनण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. हे सरकार अहंकारी असून बहुमताचा अहंकार योग्य नाही, असे सांगत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, भविष्यात आणखी काही लाख नागरिक हे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर येतील, असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल कोट्यातून भरावयाच्या विधान परिषदेतील १२ जागा सध्या रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाने त्यासाठी नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे. सर्व बाजूनं विचार करून आणि नियम-अटींचे पालन करून सरकारने ही नावे पाठवली आहेत. मात्र, नावांची शिफारस करून दोन महिने उलटल्यानंतरही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते संतापले आहेत. राज्यपालांनी आमचा अंत पाहू नये, असा इशारा कालच अजित पवार यांनी या संदर्भात बोलताना दिला होता.

काय म्हणाले  होते अजित पवार ?राज्यपाल हे महत्त्वाच्या पदावर बसलेले आहेत. त्यांनी आता याबाबतीत अंत पाहू नये. लवकरात लवकर निर्णय घ्यावा. विधान परिषदेसाठी नावांची शिफारस करताना महाविकास आघाडी सरकाने सगळे नियम, अटी पाळल्या आहेत. मंत्रिमंडळात ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री महोदयाच्या सहीने १२ नावांचे पत्र लिहिले आहे. पूर्ण बहुमत आहे. सभागृहात १७१ आमदारांचे बहुमत सिद्ध झाले आहे. एवढं सगळं असतानाही ज्यांनी अंतिम निर्णय घ्यायचा, ते सही करत नाही, असे म्हणत अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.  तसेच, आता आम्हाला कधीतरी त्यांना भेटावे लागेल. किती वेळ थांबायचे हे विचारावे लागेल. नियुक्तीचा अधिकार त्यांचा असला तरी त्याला काही काळवेळ, मर्यादा आहेच ना,' असेही अजित पवार म्हणाले होते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रFarmers Protestशेतकरी आंदोलन