“अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:01 PM2021-07-21T16:01:59+5:302021-07-21T16:03:36+5:30

शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले.

Government will fall soon and mid-term elections to be held in India says EX CM Omprakash Choutala | “अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”

“अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”

Next
ठळक मुद्देशेतकरी चिंतेत आहे. बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी कुणी येत नाही.आंदोलनाचा परिणाम काहीही असो पण केंद्र सरकार लवकरच कोसळणार आहे.सरकारमध्ये सहभागी असलेले घटक पक्ष वेगळे होत आहेत.

गाजियाबाद - हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे मंगळवारी केंद्रीय कृषी विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यूपी गेट इथं पोहचले. त्यावेळी चौटाला यांनी भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहण्याचं आश्वासन दिलं. त्याचसोबत संपूर्ण देशभरात इंडियन नॅशनल लोकदल केंद्र सरकारविरोधात आंदोलन करेल असंही ओम प्रकाश चौटाला यांनी इशारा दिला.

यावेळी बोलताना ओम प्रकाश चौटाला म्हणाले की, आंदोलनाचा परिणाम काहीही असो पण केंद्र सरकार लवकरच कोसळणार आहे. आज पूर्ण देश कृषी विधेयकाच्या विरोधात उभा आहे. शेतकरी चिंतेत आहे. बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी कुणी येत नाही. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेले घटक पक्ष वेगळे होत आहेत. केंद्र सरकार अल्पमतात येईल. सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील असा दावा त्यांनी केला.

तर शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा. ओमप्रकाश चौटाला यांच्या पाठिंब्यानं नवी उर्जा मिळाली आहे. यूपी गेटवर किसान शहीद स्मृती दिवस साजरा केला जाईल. २१ जुलै १९८० मध्ये कर्नाटकात फायरींग झाली होती त्यात २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मृती जागवण्यात येतील असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले.

कोण आहेत ओम प्रकाश चौटाला?

ओम प्रकाश चौटाला हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत. २ जुलै रोजी तिहाड जेलमधून त्यांची सुटका झाली. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी चौटाला यांना १० वर्षाची शिक्षा झाली होती.

...तर देशात युद्ध होईल

शेतकरी तर परत जाणार नाही, शेतकरी तेथेच राहतील. सरकारने चर्चा करायला हवी. ५ सप्टेंबरला मोठी पंचायत बोलावली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, त्यात घेऊ. सरकारकडेही दोन महिन्यांचा कालावधी आहे. सरकारही निर्णय घेऊ शकते, शेतकरीही करतील. सरकारने नाही ऐकलं तर देशात युद्ध होईल असं वाटतंय" असे राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

Web Title: Government will fall soon and mid-term elections to be held in India says EX CM Omprakash Choutala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app