कंगना, अर्णब विरोधातील हक्कभंगावरून जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 02:58 AM2020-12-16T02:58:25+5:302020-12-16T02:58:39+5:30

अध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान असल्याचे सांगितले आणि यासंदर्भात हक्कभंग समितीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. 

government vs opposition over privilege motion against kangana ranaut arnab goswami | कंगना, अर्णब विरोधातील हक्कभंगावरून जुंपली

कंगना, अर्णब विरोधातील हक्कभंगावरून जुंपली

Next

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावावरून विधानसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जुंपली. शेवटी अध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान असल्याचे सांगितले आणि यासंदर्भात हक्कभंग समितीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी अन् कंगनाविरुद्ध हक्कभंग दाखल केला आहे. त्यावर विचार करण्यासाठी समितीला विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी विनंती हक्कभंग समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी करताच भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला.   हा प्रस्ताव हक्कभंगातच बसत नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 
या पार्श्वभूमीवर अर्णव गोस्वामी प्रकरणात त्यांच्या वकिलाकडून कोणतीही नोटीस, समन्स बजावला गेल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये, असा ठराव सभापतींनी सभागृहात मांडला. हा ठराव बहुमताने मंजूरही करण्यात आला.  

Web Title: government vs opposition over privilege motion against kangana ranaut arnab goswami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.