शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- गिरीश महाजनांच्या मेळाव्यात का झाला 'राडा'?; जाणून घ्या संपूर्ण राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 20:01 IST

अमळनेर येथील सेना-भाजपाच्या मेळाव्यामध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.

जळगावः अमळनेर येथील सेना-भाजपाच्या मेळाव्यामध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केली, त्याच वेळी गिरीश महाजनांना धक्काबुक्की झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने पहिल्यांदा स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी ती रद्द करून त्यांच्याजागी आमदार उन्मेष पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ यांचा पत्ता कट करण्यामागे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचा गट असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहे.उदय वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. डॉ. बी. एस. पाटलांनी बऱ्याचदा भाजपाच्या वरिष्ठांकडे उदय वाघ यांची तक्रार केली आहे. त्यातच स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर उदय वाघ यांचा गट वरचढ ठरेल, या भीतीनं डॉ. बी. एस. पाटील यांनी मोर्चेबांधणी करत ऐन वेळी स्मिता वाघ यांचा पत्ता कट केला होता. तसेच डॉ. बी. एस. पाटील यांनी स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचाही उदय वाघ यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना स्टेजवर घेऊ नका, असा उदय वाघ गटाचा आग्रह होता. परंतु तो डावलत गिरीश महाजनांनी त्यांना मंचावर बोलावले आणि उदय वाघ यांनी त्यांना मारहाण केली. अमळनेर येथे भाजपाचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांची जाहीर प्रचार सभा प्रताप मिल परिसरात बुधवारी सायंकाळी झाली.या सभेसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी उपस्थित होते. सभा सुरू असताना स्मिता वाघ समर्थकांनी डॉ. बी. एस.पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरवा, असे सांगत एकच घोषणाबाजी केली. यानंतर वाघ समर्थकांनी थेट व्यासपीठावर चढून डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण  करण्यास सुरुवात केली. मंत्री गिरीश महाजन हे सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा त्यांनाही समर्थकांनी धक्काबुक्की केली. यानंतर बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरवून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हे मारहाण नाट्य जवळपास पाच ते सात मिनिटे सुरु होते.

काय आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे चित्र?जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार ए. टी. पाटील आहेत. त्यांचे तिकीट कापून भाजपाने सुरुवातीला आमदार स्मिता वाघ यांना तिकिट दिले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचेही तिकिट कापण्यात आले. आता या मतदार संघातून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील हे भाजपाकडून उमेदवारी करीत आहेत.

काय आहे नाराजी नाट्य ?भाजपातर्फे जळगाव लोकसभा मतदार संघासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी व विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर झाली होती. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र ऐनवेळी त्यांचे तिकिट कापून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.डॉ. बी. एस. पाटील यांच्यावर राग का?अमळनेरचे माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यात सुरुवातीपासून वाद आहेत. स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर डॉ.बी.एस.पाटील यांनी उघड बंड पुकारत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांना तिकिट नाकारल्यानंतर त्यांनी पारोळ्यात घेतलेल्या मेळाव्यात डॉ.बी.एस.पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ व स्मिता वाघ यांच्यावर जोरदार टीका केली होती.

भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे. झालेला प्रकार हा गंभीर आहे. ज्याने हा प्रकार घडवून आणला असेल त्यांना सोडणार नाही. कारवाई ही निश्चित केली जाईल. डॉ.बी.एस.पाटील यांना मारहाण करीत असताना आपण कार्यकर्त्यांना सोडवित होतो. आपल्याला कोणतीही धक्काबुक्की किंवा मारहाण झालेली नाही.-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र.

टॅग्स :JalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजनjalgaon-pcजळगावMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019