शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधिया व्हा, भाजपामध्ये जा; कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांना आठवलेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 09:19 IST

पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांवर आरोप करणं चुकीचं; आठवलेंचं राहुल गांधींवर शरसंधान

मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्याच पक्षातल्या कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांवर आरोप करत असतील, तर त्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.  भाजप पुढील अनेक वर्षे सत्तेत असणार आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सिब्बल आणि आझाद यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे त्या नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं पाऊल उचलायला हवं, असा सल्ला आठवलेंनी सिब्बल आणि आझाद यांना दिला. गेल्या आठवड्यात अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसची एक बैठक झाली. त्या बैठकीआधी काँग्रेसच्या देशातल्या २३ मोठ्या नेत्यांनी पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष देण्याची मागणी करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिलं होतं. त्यावरून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली होती. त्या २३ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्या नावांचा समावेश होता. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल यांनी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मोठा वादंग माजला होता.आठवलेंनी या बैठकीचा आणि त्यातील घडामोडींचा संदर्भ देत आझाद आणि सिब्बल यांना काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला. 'काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून वाद आहे. राहुल गांधींनी सिब्बल आणि आझाद यांच्यावर भाजपशी संगनमत केल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. त्यांनी काँग्रेसच्या विस्तारासाठी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे दिली आहेत. मात्र आता त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपत प्रवेश करायला हवा,' असं आठवले म्हणाले.मंदिर-मशीद उघडा अन्यथा आंदोलन, वंचितनंतर रिपाइंला 'आठवले' प्रार्थनास्थळकाँग्रेसमध्ये अपमान होत असेल, तर आझाद आणि सिब्बल यांनी पक्षातून बाहेर पडायला हवं. त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं पाऊल उचलायला हवं. इतकंच काय सचिन पायलट यांनीदेखील तसंच केलं होतं. पण मग त्यांनी माघार घेऊन समेट घडवला. काँग्रेससाठी घाम गाळणाऱ्या, कष्ट करणाऱ्या नेत्यांवर राहुल यांनी अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं असल्याचं आठवलेंनी म्हटलं.रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या वडिलांची भेट, रियाबद्दल व्यक्त केला संशय

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkapil sibalकपिल सिब्बलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे