शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

पक्षीय उंबरठे ओलांडून दिग्गज नेते एकत्र, याचा मोठा आनंद; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 06:09 IST

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचे लाेकार्पण

मुंबई : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे हे आपल्या देशाचे मोठे नेते व मार्गदर्शक होते. त्यांचे विचार आज आणि उद्याही आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यांच्या कारकीर्दीत अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे ऋणानुबंध होते. सर्वपक्षीय दिग्गज नेते पक्षीय उंबरठे ओलांडून एकत्र आले आहेत, हा माझ्या आयुष्यात अविस्मरणीय दिवस आहे. यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कुलाबा येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला सर्वपक्षीय दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे राजकारणातील दुर्मिळ चित्र यानिमित्ताने दिसून आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोनशिलेचे लोकार्पण केले.

या नेत्यांची उपस्थितीकार्यक्रमाला विधानसभेचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री असलम शेख आदी शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला.

पुतळा साकारणाऱ्या शशी वडके यांचा सत्कारशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा हुबेहुब साकारणारे शिल्पकार शशी वडके यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वास्तुविशारद रोहन चव्हाण यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते, सल्लागार भूपन रामनाथकर यांचा शरद पवार यांच्याहस्ते, तर अभियंता प्रदीप ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, भगवे झेंडे आणि शिवसैनिकांच्या गर्दीने हा परिसर भगवामय झाला होता. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. नऊ फूट उंच आणि १२०० किलो ब्रॉन्झ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस