शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी पाडले काँग्रेसला 'खिंडार'; केरळची महिला नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 19:23 IST

Lathika Subhash news: काँग्रेस कार्य़ समितीचे सदस्य असलेले चाकोदेखील याच महिन्यात राष्ट्रवादीमध्ये आले होते. चाको यांनी 10 मार्चला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी मुंबईत येत निवडणुकीचा प्रचार सुरु असताना शरद पवारांची भेट घेतली होती.

keral politics: केरळमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकिट न मिळाल्याने मुंडन करणाऱ्या राज्य महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा लतिका सुभाष (Lathika Subhash) या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या (sharad Pawar) राष्ट्रवादीचे केरळ प्रदेशाध्यक्ष पी सी चाको यांच्यासोबत लतिका यांची चर्चा झाली असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. (Former Mahila Congress Chief Lathika Subhash is likely to join the National Congress Party. )

महत्वाचे म्हणजे काँग्रेस कार्य़ समितीचे सदस्य असलेले चाकोदेखील याच महिन्यात राष्ट्रवादीमध्ये आले होते. चाको यांनी 10 मार्चला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी मुंबईत येत निवडणुकीचा प्रचार सुरु असताना शरद पवारांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीवरून गटबाजी केल्याचा आरोप चाको यांनी केला होता. 

'तुम्ही भाजपाचे खासदार, मग मोदींना भेटत का नाही?' ट्विटरवरील प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामींचे उत्तर...

राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, जो काँग्रेसच्या परंपरेशी जोडलेला आहे. तसेच चाकोंसोबत चांगले संबंध आहेत. यामुळे मी चाकोंसोबत चर्चा केली. लवकरच माझ्या निर्णय़ाची घोषणा केली जाणार आहे, असे लतिका सुभाष यांनी सांगितले. 

लतिका सुभाष यांचा अनुबव पाहता त्यांना पक्षात एक मोठी जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे. सुभाष या 6 एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत एत्तुमानूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या होत्या. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपण अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे म्हटले होते.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसKeralaकेरळNCPराष्ट्रवादी काँग्रेस