शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

Yashwant Sinha Joins TMC : "... तेव्हाच ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला"; माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा TMC मध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 14:25 IST

Yashwant Sinha Joins TMC : अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा दीर्घकाळापासून सक्रीय राजकारणातून दूर होते. त्यानंतर आता शनिवारी (13 मार्च) सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्याकडून दिनेश त्रिवेदी यांच्या जागेवर यशवंत सिन्हा यांना राज्यसभेत धाडलं जाऊ शकतं.

'ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये जो हल्ला झाला. तो टिपिंग पॉईंट होता. तेव्हाच मी तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा आणि ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला' असं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे. याच दरम्यान सिन्हा यांनी भाजपावर देखील हल्लाबोल केला आहे. "अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भाजपाचा सर्वसाधारण सहमतीवर विश्वास होता. मात्र आजच्या सरकारचा केवळ दडपशाही आणि जिंकण्यावर विश्वास आहे. अकाली दल, बीजेडी देखील भाजपामधून वेगळे झाले आहेत. आज भाजपासोबत कोण उभं आहे?' अशा शब्दांत यशवंत सिन्हा यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

आयएएसची नोकरी सोडून यशवंत सिन्हा राजकारणात दाखल झाले होते. चंद्रशेखर सरकारमध्येही ते मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयींच्या ते अगदी जवळचे नेते होते. परंतु, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा मात्र वेगळी असल्याचं मत त्यांनी अनेकदा व्यक्त केलं. यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारचा अनेकदा विरोध केला होता. मोदींच्या आर्थिक धोरणांसहीत परराष्ट्र धोरणांवरही त्यांनी अनेकदा उघडपणे टीका केली होती. यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा हे मात्र भाजपाचे खासदार आहेत.

"गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत", बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMCमध्ये प्रवेश

बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी (Syantika Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. टीएमसीचे महासचिव पार्थ चॅटर्जी, मंत्री सुब्रत चॅटर्जी आणि ब्रात्य बसु यांच्या उपस्थितीत सायंतिका यांनी पक्षात प्रवेश केला आहे. सायंतिका बॅनर्जी यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करताच भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगालला केवळ ममता दीदी हव्या आहेत. "मला ही संधी दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे मनापासून आभार. मी आज अधिकृतरित्या TMC मध्ये प्रवेश केला. मात्र खरं सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत आहे. हीच वेळ आहे मतदारांकडे आपलं भविष्य उज्वल करण्याची. बंगालला फक्त बंगालची मुलगी हवी आहे. बंगालला केवळ ममता बॅनर्जी हव्या आहेत" असं सायंतिका बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपाtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीIndiaभारत