शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

"रश्मी शुक्ला यांना माफ केले; चुकीला माफी नाही, ही शिकवण सरकार विसरले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 06:01 IST

शिवाजी महाराजांचे तत्त्व होते, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले. सगळ्या चुका करून रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या

मुंबई/ठाणे : फोन टॅपिंग प्रकरण उघड झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी ‘‘मै माफी मांगती हूँ, मेरा लेटर वापस दे दो”, अशा शब्दांत माफी मागितली होती. मात्र त्यांना माफी देणे चूकच होते, असे  गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्र परिषदेत सांगितले.आव्हाड म्हणाले की महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांची शिकवण विसरले. सरकारकडून आपण खूप मोठ्या हृदयाचे आहोत, हे दाखविण्याची चूक झाली.

शिवाजी महाराजांचे तत्त्व होते, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले. सगळ्या चुका करून रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा म्हणाल्या, तर कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटतोच. पण हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे लक्षातच आले नाही”, असा देखील दावा  आव्हाड यांनी केला. 

रश्मी शुक्ला यांच्या कथित अहवालाचा संदर्भ देऊन आव्हाड म्हणाले की चौबे नावाचे अधिकारी कायदा-सुव्यवस्था सह आयुक्त होते.  त्यांचे संबंध थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत असतात. ते कुठल्यातरी नवाज, इंगोलेसोबत बोलतील का? यांनीच माणसे पेरायची प्लांट करायची, यांनीच माणसांना संभाषण करायला लावायचं, यांनीच ते टेप करायचं आणि यांनीच त्याचा वापर बाजारात करायचं, असे हे षडयंत्र असल्याचे आव्हाड म्हणाले.

आमदारांवर रश्मी शुक्लांचा दबाव? जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी दुपारी रश्मी शुक्ला यांच्याबाबत एक ट्वीट केलं होतं. “शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर (आताचे राज्यमंत्री) यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपबरोबर रहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचादेखील प्रयत्न केला होता. अजून काय पुरावे पाहिजेत?”, असा सवाल आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरे