शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

उत्तर भारतातील बहुजनांचा पहिला पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 04:09 IST

उत्तर भारतात मात्र जातीव्यवस्था अतिशय कडवी होती, शिक्षणाचे प्रमाण कमी होते आणि जमीनदारीही मोठी होती. परिणामी उत्तर प्रदेशात ‘आहे रे’पेक्षा ‘नाही रे’ वर्ग मोठा होता.

- संजीव साबडेमहाराष्ट्रात महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज तर तामिळनाडूमध्ये रामस्वामी नायकर, केरळमध्ये नारायण गुरू असे अनेक समाजसुधारक झाले होते. उत्तर भारतात मात्र जातीव्यवस्था अतिशय कडवी होती, शिक्षणाचे प्रमाण कमी होते आणि जमीनदारीही मोठी होती. परिणामी उत्तर प्रदेशात ‘आहे रे’पेक्षा ‘नाही रे’ वर्ग मोठा होता.भारतात पूर्वापार उत्तरेकडील राजकारणाची सूत्रे ब्राह्मण व उच्च जातींच्या हाती होते, तर दक्षिण भारतातील तामिळनाडूपासून, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रापर्यंत सर्व राज्यांत समाज सुधारणा झाल्या होत्या.महाराष्ट्रात महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज तर तामिळनाडूमध्ये रामस्वामी नायकर, केरळमध्ये नारायण गुरू असे अनेक समाजसुधारक होऊ न गेले होते. उत्तर भारतात मात्र जातीव्यवस्था अतिशय कडवी होती, शिक्षणाचे प्रमाण कमी होते आणि जमीनदारीही मोठी होती. परिणामी ‘आहे रे’पेक्षा ‘नाही रे’ वर्ग मोठा होता. भारतीय स्वातंत्र्यानंतर दलित, आदिवासी यांना आरक्षण मिळाले. पण त्यांच्यापेक्षा काहीसा वर, तरीही उच्च जातींमध्ये न मोडणारा म्हणजे ओबीसी, मागास वा उत्तरेकडील भाषेत बोलायचे तर पिछडा हा वर्ग सर्वच क्षेत्रांत मागे होता.

काँग्रेसचे उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेशातील नेते व मुख्यमंत्री प्रामुख्याने उच्च जातींतील वा ब्राह्मणच होते. दलित-आदिवासींना शिक्षण, सरकारी नोकऱ्यांत आरक्षण मिळाले होते, पण त्यांना राजकीय नेतृत्व नव्हते. दलितांवरील अत्याचार कमी होत नव्हते. तत्कालिन समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे कर्पुरी ठाकूर, राम विलास पासवान, लालुप्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, शरद यादव हे दलित वा मागास समाजातील नेते समाजवादी चळवळीकडे आकर्षित झाले. पण मुळात समाजवादी चळवळीचा जीव त्या काळात फार मोठा नव्हता.
अशा स्थितीत १९८४ साली कांशीराम यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. त्यात प्रादेशिक अस्मितेचा नव्हे, तर दलित अस्मिेतेचा मुद्दा महत्त्वाचा होता. कांशीराम यांचा जन्म पंजाबमधील. पदवी घेतल्यानंतर त्यांना पुण्यात सरकारी नोकरी मिळाली. तिथे असताना त्यांना रिपब्लिकन पार्टीशी संबंध आला, महाराष्ट्र तसेच दक्षिणेकडील समाजसुधारकांची माहिती मिळाली. पण रिपब्लिकन नेते काँग्रेसचीच साथ सतत करतात आणि काँग्रेस त्यांचा वापर करून घेते, हे लक्षात आल्याने त्यांनी पक्षाची साथ सोडली.पुढे १९७८ मध्ये बामसेफची (बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटिज एम्प्लॉयीज फेडरेशन) स्थापना केली. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ते पाहून १९८१ साली महापरिनिर्वाण दिनी मग डीएस-फोर (दलित शोषित समाज संघर्ष समिती) संघटनासुरू केली. या संघटनेची घोषणा होती ‘ब्राह्मण, ठाकूर, बनिया चोर, बाकी सब है डीएसफोर’. त्यातूनच बहुजन समाज पक्ष उभा राहिला. शाळेत शिक्षिका असलेल्या मायावती या पक्षात येणाºया सुरुवातीच्या कार्यकर्त्या. त्याच कांशीराम यांच्या वारसदार बनल्या आणि त्यांच्या पश्चात त्याच प्रमुखही आहेत.पंजाबमध्ये जन्मलेल्या कांशीराम यांचा बसप त्या राज्यापेक्षा उत्तर प्रदेशातच अधिक फोफावला. याचे कारण पंजाबमध्ये शीख राजकारणाचा प्रचंड प्रभाव होता. त्यापुढे बसप टिकणे अवघड होते. पण उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपने खळबळ माजवली. मायावती तीनदा मुख्यमंत्री बनल्या. पण एकदाही त्यांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही. त्यांनी कधी मुलायम सिंह यादव तर कधी भाजपशी समझोता केला. पण रिपब्लिकन पक्षाप्रमाणे आपला पक्ष कोणाच्या वळचणीला बांधला नाही. तसेच पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी मुस्लिमांप्रमाणेच ब्राह्मण व अन्य जातींनाही सोबत घेतले आणि पक्षाचा प्रभाव वाढवत नेला. आता मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटकमध्येही बसपचे आमदार आहेत. पण त्या राज्यांत त्या प्रभाव मात्र पाडू शकलेल्या नाहीत.समाजवादी पक्षाच्या ज्या मुलायम सिंह यादव यांच्याशी वैर होते, त्यांचा मुलगा अखिलेश यांच्याशी त्यांनी यंदा समझोता केला आहे. गेल्या वर्षी पोटनिवडणुकांत केलेल्या समझोत्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाल्याने दलित, ओबीसी, मुस्लीम यांचे प्रतिनिधीत्व करणारे पक्ष आता एकत्र आहेत. बसप हा पूर्णपणे व्यक्तीकेंद्रित पक्ष आहे त्या सभेत वा पत्रकार परिषदेत काय बोलायचे, ते लिहूनच आणतात. मायावती यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्याची प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत. पण उत्तर प्रदेशातील दलित आजही त्यांना नेता मानतात. त्यांच्या व अखिलेश यांच्या नेतृत्वाची या लोकसभा निवडणुकांत कस लागणार आहे.उद्याच्या अंकात : बिहारमधील यादवांचे नेते लालुप्रसाद

टॅग्स :mayawatiमायावतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी