Farooq Abdullah's dance to the song 'Aaj Kal Tere Mere Pyaar Ke Charche', VIDEO goes viral | ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ गाण्यावर फारुख अब्दुल्लांचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल

‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ गाण्यावर फारुख अब्दुल्लांचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल

ठळक मुद्देएका लग्नसोहळ्यामध्ये फारुख अब्दुल्लांचे वेगळे रूप पाहायला मिळालेपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या लग्नामध्ये फारुख अब्दुला ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ या गाण्यावर फारुख अब्दुल्ला यांनी जोरदार डान्स केलाआता अब्दुल्लांच्या या डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला हे (Farooq Abdullah) आपली रोखठोक विधाने आणि राजकीय भूमिकेसाठी नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, नुकत्याच एका लग्नसोहळ्यामध्ये (Marriage) फारुख अब्दुल्लांचे वेगळे रूप पाहायला मिळाले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amarinder singh) यांच्या नातीच्या लग्नामध्ये फारुख अब्दुला ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ या गाण्यावर फारुख अब्दुल्ला यांनी जोरदार डान्स केला. यावेळी अब्दुल्लांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही आपल्यासोबत नाचायला लावले. आता अब्दुल्लांच्या या डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Farooq Abdullah's dance to the song 'Aaj Kal Tere Mere Pyaar Ke Charche', VIDEO goes viral)

हा विवाह सोहळा गेल्या आठवड्यात नवी दिल्लीमध्ये झाला होता. या विवाह सोहळ्यात अनेक बडे नेते सहभागी झाले होते. या व्हिडीओमध्ये सुरवातीला गुलाबी आँखे जो तेरी देखी या गाण्यावर फारुख अब्दुल्लांनी नाच केला. त्यानंतर ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ हे गाणे लागल्यावर अब्दुल्ला यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही सोबत घेत नाचण्यास सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये इतर काही जणसुद्धा डान्स करताना दिसत आहेत. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर हजारो युझर्ससह काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक सरल पटेल यांनीही शेअर केला आहे. सरल पटेल यांनी लिहिले की, फारुख अब्दुल्ला आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी वय हा केवळ आकडा असतो हे सिद्ध केलंय. 

फारुख अब्दुल्ला यांच्यावर अनेकवेळा शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. तसेच त्यांचे वयही झालेले आहे. मात्र असे असतानाही कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या विवाह सोहळ्यात त्यांनी ज्याप्रकारे डान्स केला तो पाहून त्यांचे कौतुक होत आहे. 
 
 

Web Title: Farooq Abdullah's dance to the song 'Aaj Kal Tere Mere Pyaar Ke Charche', VIDEO goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.