शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: कृषी कायद्यांवरून एनडीएला दुसरा धक्का; मोदींनी मित्रपक्ष गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 19:09 IST

Farmer Protest : बेनिवाल यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्ष 26 डिसेंबरला 2 लाख शेतकऱ्यांना घेऊन राजस्थानहून दिल्लीला जाण्यासाठी कूच करेल. तेव्हाच एनडीएमध्ये रहायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले होते.

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनावरून शेतकरी आणि विरोधकांनी आधीच मोदी सरकारला घेरलेले असताना एनडीएच्या मित्रपक्षांमध्येही बंडाचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे भाजपा शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही पक्षाने (RLP) एनडीए सोडत असल्याची घोषणा केली आहे. 

आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी याचे संकेत दिले आहेत. एनडीएला शिवसेना आणि अकाली दलाने आधीच सोडले आहे. आम्हीही एनडीए सोडणार आहोत. बेनिवाल म्हणाले की, मी आज एनडीए सोडत असल्याची घोषणा करतो. तीन कृषी कायद्यांविरोधात मी रालोआची साथ सोडली आहे. हे कायदे शेतकरी विरोधी आहेत. जरी मी रालोआ सोडले असले तरीही मी काँग्रेसला साथ देणार नाही. मोदींकडे 303 खासदार आहेत, त्यामुळेच ते कोणाला न जुमानता कृषी कायदे मागे घेत नाहीएत. 1200 किमी लांबहून राजस्थानचे शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. हरियाणाच्या सीमेवरील शाहजहांपूरमध्ये झालेल्या बैठकीनंतर आम्ही एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

बेनिवाल यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्ष 26 डिसेंबरला 2 लाख शेतकऱ्यांना घेऊन राजस्थानहून दिल्लीला जाण्यासाठी कूच करेल. तेव्हाच एनडीएमध्ये रहायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले होते. बेनिवाल हे जाटांचे नेते आहेत. ते नागौरहून खासदार आहेत. बेनिवाल यांनी याआधीच शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संसदेच्या तीन समित्यांचा राजीनामा दिला आहे. शिरोमनी अकाली दलाने तीन महिन्यांपूर्वीच कृषी विधेयकांना विरोध करत एनडीएची साथ सोडली होती.

मोदी सरकारचेच आंदोलनाला फंडिंग; पंजाबच्या शेतकऱ्यांचा खळबळजनक आरोप

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात एकीकडे मोठ्या संख्येने शेतकरी दिल्ली सीमेवर गेल्या महिनाभरापासून उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये टाकले आहेत. हे पैसे पंजाब, हरियाणाच्या आंदोलक शेतकऱ्यांनाही मिळालेले आहेत. यामुळे मोदी सरकारच शेतकरी आंदोलनाला फंडिंग करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

बँक खात्यात पैसे आल्यानंतर पंजाबच्याच शेतकऱ्यांनी हा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आंदोलन करण्यासाठी हा पैसा पाठविला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पैसा कोण पुरवते, असा सवाल भाजपाच्याच नेत्यांनी उपस्थित केला होता. यावर या शेतकऱ्यांनी केलेले हे आरोप या प्रश्नाचे उत्तर असल्याचे म्हटले जात आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी