शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

'फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:53 IST

काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास विकास आराखड्यासह फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दिला.

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईचा विकास आराखडा दोनदा बदलून दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास विकास आराखड्यासह फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दिला.दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या चेंबूर येथील प्रचारसभेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, कारगिलप्रमाणेच पुलवामा येथील हल्लासुद्धा गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. कारगिल युद्धानंतर वाजपेयींनी सर्व घटनांच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. वाजपेयींसारखी हिंमत मोदी दाखविणार का, असा सवाल करतानाच, हे सरकार शहिदांच्या हौतात्माचे राजकारण करून मते मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. राफेल प्रकरण हे या सरकारचा सर्वात मोठा घोटाळा आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास तब्बल छत्तीस हजार कोटींच्या या घोटाळ्याची चौकशी करून दोषींना तुरुंगात डांबणार असल्याचा पुनरुच्चारही चव्हाण यांनी केला.‘काँग्रेस गरिबीचे उच्चाटन करेल’२०१४च्या प्रचारात मोदींनी समाजातील प्रत्येक घटकाला वारेमाप आश्वासने दिली. पाच वर्षांनंतर आश्वासनपूर्तीचा लेखाजोखा मांडायचे सोडून, भाजपने पुन्हा एकदा आश्वासनांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. याउलट काँग्रेसचा जाहीरनामा देशातील वीस टक्के गरिबांना नजरेसमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. इंदिरा गांधींनी केलेल्या प्रभावी कामामुळे देशातील गरिबीचा दर कमी झाला होता. आता ‘न्याय’ योजनेमुळे गरिबीचे समूळ उच्चाटन होईल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील