शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटके, वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय, गृहमंत्रालयाने विश्वासार्हता गमावलीय, राज्यातील जनता म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 21:39 IST

Maharashtra Politics News : अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अंबानींच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्याचे प्रकरण आणि या प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा (Sachin Vaze) उघड झालेला सहभाग तसेच त्यामधून झालेले धक्कादायक गौप्यस्फोट यामुळे राज्य सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. दरम्यान, या घटनांनंतर राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Politics) आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे. (Explosives, Waze case has tarnished the image of the state government, the Home Ministry has lost credibility, the people of the state say ...)

या सर्व्हेमधून राज्य सरकारने कोरोनाकाळात केलेल्या कामगिरीबाबत विविध प्रश्न विचारून जनतेचा कल जाणून घेण्यात आला. यावेळी अंबानी स्फोटक प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय का? असा प्रश्न विचारला असता तब्बल ४३ टक्के जनतेने होय असे उत्तर दिले आहे. तर २९ लोकांनी नाही, असे उत्तर दिले. तर २८ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले. 

यावेळी वाझे प्रकरणामुळे गृहखात्याने विश्वासार्हता गमावली का असा प्रश्न सर्व्हेमधून विचारला असता ४८ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले. तर २५ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. उर्वरित २७ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे सांगितले.  या सर्व्हेमध्ये कोरोना काळात ठाकरे सरकारनं परिस्थिती योग्य रितीनं हाताळली का, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. त्यावर ४४ टक्के लोकांनी होय, तर ३६ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. तर २० टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं. लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं का, या प्रश्नाला होय असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ४८ टक्के, तर नाही असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ३१ टक्के इतकं आहे. सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण २१ टक्के आहे. एबीपी माझानं याबद्दलचं सर्वेक्षण केलं आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख