शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Assam Exit Poll 2021: 'चहाच्या मळ्या'त पुन्हा 'कमळ' फुलणार; आसामबाबत सगळ्या एक्झिट पोलचं एक(च)मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:17 IST

ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले.

ठळक मुद्देएकूण १२६ जागांपैकी भाजपा ९३, एजीपी २९, यूपीपीएल ११ जागांवर निवडणूक लढवत होतीकाँग्रेस ९५, एआययूडीएफ २०, बीपीएफ १२, डावे ७, आंचलिक गण मोर्चा १ आणि आरजेडी १ जागांवर निवडणूक लढवत होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १२६ जागांपैकी भाजपाला ६०, काँग्रेस २६ जागांवर विजयी होती

नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. २ मे रोजी निकाल जाहीर होणार असले तरी तत्पूर्वी अनेक चॅनेल्सने एक्झिट पोलनुसार निकालांचा अंदाज वर्तवला आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाचं कमळ फुलणार असून याठिकाणी भाजपा सरकार बनवू शकतं अशी आकडेवारी आहे. राज्यात भाजपाला ८५ जागा मिळतील असा अंदाज दाखवण्यात आला आहे. तर काँग्रेसला मागच्या वेळच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे.

मतदानाच्या टक्केवारीत कोण किती पुढे?

पक्षमतदानाची टक्केवारी 
भाजपा +४८ टक्के
काँग्रेस४० टक्के 
अन्य १२ टक्के 

 

कोणाला मिळणार किती जागा?

भाजपा आघाडीला राज्यात ७५ ते ८५ जागा मिळण्याचा अंदाज

भाजपा – ६१-६५ जागा

एजीपी – ९-१३ जागा

यूपीपीएल – ५-७ जागा

काँग्रेस आघाडीला राज्यात ४० ते ५० जागा मिळण्याचा अंदाज

काँग्रेस – २४-३० जागा

एआययूडीएफ – १३-१६ जागा

बीपीएफ – ३-४ जागा

तर अन्य १-४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आघाडी आणि काँग्रेस आघाडीत अटीतटीची लढत होती. तर तिसरी आघाडी म्हणून आसाम जातीय परिषद आणि रायजोर दर मैदानात होतं. भाजपाच्या नेतृत्वात आसाम गण परिषद आणि यूनाइटेड पीपल्स पार्टी लिबरल यांचा समावेश आहे. राज्यात एकूण १२६ जागांपैकी भाजपा ९३, एजीपी २९, यूपीपीएल ११ जागांवर निवडणूक लढवत होती तर भाजपा आघाडीत सात जागांवर मैत्रीपूर्ण लढत होती. आज तकनं दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये निकालाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 काँग्रेसच्या आघाडीत ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट, बोडोलैंड पीपल्स फ्रंट, आंचणिक गण मोर्चा, आरजेडी, डावे पक्ष सहभागी होते. काँग्रेस ९५, एआययूडीएफ २०, बीपीएफ १२, डावे ७, आंचलिक गण मोर्चा १ आणि आरजेडी १ जागांवर निवडणूक लढवत होती. १० जागांवर काँग्रेस आघाडीत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळत होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १२६ जागांपैकी भाजपाला ६०, काँग्रेस २६, ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट १३, आसाम गण परिषद १४, बोडोलँड पीपल्स फ्रंट १२ आणि अपक्षांना एका जागेवर विजय मिळाला होता.

 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकexit pollमतदानोत्तर जनमत चाचणीAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021