शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची 'न्याय' योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामा; नरेंद्र मोदींची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी काँग्रेसच्या न्याय योजनेवर टीका केली आहे. काँग्रेसची न्याय योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामाच असल्याचा घणाघात मोदींनी केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसनं जनतेला आश्वासन दिलं आहे की, जर आमचं सरकार केंद्रात सत्तेवर आलं तर गरिबांना प्रतिमहिना 6 हजार रुपये म्हणजेच वर्षाला 72 हजार रुपये देऊ. काँग्रेसनं या योजनेला न्याय असं नाव दिलं.मुलाखतीत मोदींना न्याय योजनेसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, त्यांचा मुख्य मंत्र हाच आहे की, आता होणार न्याय. म्हणजेच ते मान्य करतात 60 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जनतेवर अन्याय केला. काँग्रेस जेव्हा न्यायाची भाषा वापरते, तेव्हा अनेकांना काँग्रेसनं न्याय दिलेला नाही हे प्रकर्षानं समोर येतं, 1984च्या शीख दंगल पीडितांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यांना काँग्रेस न्याय देणार आहे काय?, तिहेरी तलाकमुळे पीडित असलेल्या महिलांना काँग्रेस न्याय देणार आहे काय?, काँग्रेसची ही योजना त्यांना न्याय मिळवून देईल काय?. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यांना 10 दिवसांत न्याय देतो, असं सांगण्यात आलं होतं, परंतु 100 दिवस झाले तरी त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय केव्हा मिळणार?, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला.भोपाळ गॅस दुर्घटना पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही. प्रतिष्ठित वैज्ञानिक नंबी नारायणही काँग्रेसकडे न्याय मागत आहेत. ज्यांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात धाडण्यात आलं. काँग्रेस त्यांना न्याय देणार काय?, समझोता बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवल्या गेलेल्या निरपराध लोकांना काँग्रेसनं न्याय दिला काय?, काँग्रेसनंच हिंदू दहशतवाद हा शब्द प्रचलित केला. देशातील हिंदू न्याय मागत असताना त्यांना दहशतवादी का संबोधण्यात आलं. नरसिंह राव यांनी काँग्रेससाठी जीवन समर्पित केलं, परंतु त्यांचं पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयात ठेवू दिलं नाही. नरसिंह राव यांची आत्मा काँग्रेसकडे न्याय मागत आहे?, असंही मोदी म्हणाले आहेत. एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय योजनेवरून काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस