शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

"राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं", त्या व्हिडिओवरून फडणवीसांचा काँग्रेसला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 19:06 IST

Devendra Fadnavis News: मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते दरवाढी विरोधात आंदोलन करत असताना बैलगाडी मोडून सर्व नेते खाली पडल्याचा प्रकार आज घडला होता.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा देत होते कदाचित राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं त्यामुळे ती बैलगाडी मोडली, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी त्या व्हिडिओवरून काँग्रेसला लगावला

मुंबई - पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या दरात झालेल्या बेसुमार वाढीविरोधात काँग्रेसने आज राज्यातील विविध भागात आंदोलन केले होते. दरम्यान, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीनेही विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्यापेक्षा आंदोलनातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यावरून काँग्रेसच्या आंदोलनाचे हसे होत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील असून मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते दरवाढी विरोधात आंदोलन करत असताना बैलगाडी मोडून सर्व नेते खाली पडल्याचा प्रकार आज घडला होता. दरम्यान, आता या व्हिडीओवरून राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. (Even the bulls should not like Rahul Gandhi being called the national leader, Devendra Fadnavis slammed the Congress)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही काँग्रेसच्या आंदोलनाचा व्हिडीओ लक्षपूर्वक ऐकला तर लक्षात येईल की, आंदोलनादरम्यान, काँग्रेसचे नेते देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा देत होते. कदाचित राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं, त्यामुळे ती बैलगाडी मोडली, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी त्या व्हिडिओवरून काँग्रेसला लगावला.

इंधन दरवाढीविरोधात आज मुंबई काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि अन्य नेते बैलगाडीवरून आंदोलनात सहभागी झाले होते. बैलगाडीवर जास्त नेते झाल्यानं ती कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह सगळे नेते खाली कोसळले.

या घटनेवरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगतापPoliticsराजकारण