शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एळकोट: कर्त्या पोरांचा जमला मेळा अन् बापाच्या पोटात उठला गोळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 03:15 IST

मोरूने आन्हिक आटोपले. पांढरी सुरुवार चढवून त्यावर भगवा कुर्ता घातला. गळ्यात कधी भगवे, तर कधी हिरवे-भगवे उपरणे टाकत होता;

सुधीर महाजनगेल्या आठवडाभरापासून मोरूचा बाप बेचैन होता. अन्नपाणी गोड लागत नव्हते, की रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. सगळा उत्साह आटून गेल्यासारखे होते. भरगणपतीमध्ये त्याला एका निराशेने घेरले होते. सगळीकडे उदासीनता भरून राहिली होती. तो कोणाशीही बोलत नव्हता. गणपतीच्या धामधुमीत बायको, सून कोणाच्याही लक्षात आले नव्हते. घड्याळाचा आचके देत गजर झाला. बॅटरी संपली असावी. त्याने पाहिले. सकाळचे साडेचार वाजले होते. मोरूच्या खोलीतला लाईट लागला. मोरू बाहेर आला आणि ब्रशवर पेस्ट घेऊन दात घासायला सुरुवात केली. किलकिल्या डोळ्याने मोरूचा बाप हे पाहत होता. उन्हं वर आल्याशिवाय न उठणारं कार्ट भल्या पहाटे गजर लावून का उठलं याचं त्याला कोडं पडलं.

गेल्या महिन्याभरापासून मोरूचे लक्षण ठीक दिसत नव्हते. यावर्षी तो न वर्गणी मागायला गेला, ना त्याने गणपतीत भाग घेतला. याचेही मोरूच्या बापाला आश्चर्च वाटले. काल तर विसर्जनाच्या दिवशी मोरूने कपड्याचे कपाट रिकामे केले. पांढरे कुर्ते, गांधी टोप्या बाजूला काढल्या आणि नव्याने खरेदी केलेले भगवे कुर्ते हिरव्या-भगव्या रुमालांची व भगव्या टोप्यांची चळत त्याने नाजूक हाताने ठेवली. काय हे भडक कपडे आणले, या बायकोच्या प्रश्नावर मोरू भडकला. बायकोलाही आश्चर्य वाटले. पांढऱ्या कपड्यावर साधा डाग न सहन करणाºया मोरूची टेस्ट अशी कशी अचानक बिघडली. मोरूच्या बापानेही कान लावून हे ऐकले होते.

मोरूने आन्हिक आटोपले. पांढरी सुरुवार चढवून त्यावर भगवा कुर्ता घातला. गळ्यात कधी भगवे, तर कधी हिरवे-भगवे उपरणे टाकत होता; पण नेमके कोणते उपरणे राहू द्यावे याचा निर्णय होत नव्हता. सारखे उपरणे हातात घेऊन बायकोही अवघडली होती. मोरूचा हा प्रकार बाप पलंगावर पडल्यापडल्या किलकिल्या डोळ्याने न्याहाळत होता. हे पाहून त्याच्या पोटात खड्डा पडला, पोरगं वाट बदलतंय वाटतं, म्हणजे आपली साथ नक्की सोडणार. पोरगं सोडून गेलं की काय होतं, याचा अंदाज उस्मानाबादच्या हिंदकेसरी पहिलवानाच्या अवस्थेवरून आला होता. एकेकाळी सगळ्यांना आस्मान दाखवणारे हे पहिलवान हतबल झाले होते. गुजरातमधल्या एका बनियाला भेटण्यासाठी पोरगा त्यांना घेऊन सोलापुराकडे निघाला. अर्ध्या वाटेवर असतानाच बनियाने निरोप पाठवला की, बापाला सोडून एकटाच ये. पोराने बापाला घरी सोडण्याऐवजी अर्ध्या वाटेवरच कारमधून उतरवून दिले आणि सुसाट वेगाने निघून गेला. तेव्हा पहिलवानाची अवस्था ‘घर का, ना घाट का’, अशी झाली. पोरगं सोडून निघून गेलं. पोराला जन्म दिला, वाढवलं. त्याच्यासाठी एवढी इस्टेट उभी केली.

आपल्या हातातले घड्याळ काढून त्याच्या हातावर बांधले. अगदी वानप्रस्थाश्रमाच्या उंबरठ्यावर उभे राहून पोराचे कल्याण चिंतले; पण पोरगं भरदुपारी भररस्त्यावर सोडून निघून गेलं. नेमकी हीच भीती मोरूच्या बापाला वाटत होती आणि आता मोरूची उपरण्याची घालमेल पाहून त्याच्या पोटात खड्डाच पडला. पोरगं घराबाहेर काढते का, याची चिंता वाढली. मोदींचं ऐकलं नाही, याचाही पश्चात्ताप झाला. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ असे मोदींनी सांगितले अन् ‘साहेबांनी’ ऐकले; पण आपण साहेबांचे पट्टशिष्य असूनही त्यांचे साधे अनुकरण केले नाही, याचा पश्चात्ताप झाला. ‘साहेबांची पोरगी कर्ती झाली आणि आता तिने घराची सगळी सूत्रे हाती घेतली; पण आपल्यासारखेच साहेबांच्या पाठीराख्याचे पोर पाय लावून पळाले. ही पोरगी भरपावसात आंधळी कोशिंबीर खेळताना दिसते. डोळ्याला पट्टी लावून ती साहेबांच्या साथीदाराला पकडते; पण ज्याला पकडते त्यावेळी पट्टी काढून पाहताच त्या साथीदाराच्या खांद्यावर भगवा-हिरवा रुमाल दिसतो, तरी पण ती हिंमत खचू देत नाही, याचा मोरूलाही अभिमान वाटला आणि साहेबांचा हेवाही. पोरगं नेमकं कोणत्या घरात जातं याची काळजी त्याला वाटते.

मोरूच्या बापाची चुळबुळ वाढली, तसे सूनबाईचे लक्ष गेले. मामंजी उठले वाटतं? असं स्वत:शी बोलत ती जवळ आली ‘‘बाबा उठा, चहा टाकते’’ अशी म्हणत ती स्वयंपाकघराकडे वळली. तिला पाठमोरी पाहून मोरूचा बाप म्हणाला ‘सूनबाई माझं पित्त खवळलं वाटतं जरा, देशी गायीचं दूध देऊन पाहते का?

टॅग्स :BJPभाजपा