शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मिठाचा खडा टाकू नका; तिन्ही पक्षांनी समन्वय ठेवावा, अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 06:04 IST

Ajit Pawar Criticize Sanjay Raut : अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले असल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर राष्ट्रवादीने तीव्र आक्षेप घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य करत राऊत यांना अप्रत्यक्षपणे फटकारले आहे.

मुंबई : अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले असल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर राष्ट्रवादीने तीव्र आक्षेप घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य करत राऊत यांना अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सरकारचे कामकाज सुरू असताना मिठाचा खडा टाकू नये, असा इशारावजा सल्ला अजित पवारांनी राऊत यांना दिला.जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे, दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही, असे राऊत म्हणाले होते.त्यावर अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले आहेत. बऱ्याचदा उपमुख्यमंत्री कोण होणार, याचे निर्णयदेखील घेतले आहेत. याबद्दल महाविकास आघाडी वगळता एखाद्या त्रयस्थाने काही विधान केल्यास समजू शकतो. पण महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सरकारचे कामकाज सुरू असताना मिठाचा खडा टाकू नये, अशा शब्दांत त्यांनी राऊत यांना सुनावले. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांबद्दल अशी विधाने करू नयेत. एकमेकांविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी. ते काय बोलले, हे त्यांना माहीत आहे. आपल्यातील कोणी अशा प्रकारे एखाद्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असेही पवार म्हणाले.शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे, या राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनीही समाचार घेतला होता. राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?, असा सवाल त्यांनी केला होता. शिवसेना हा युपीएचा घटक पक्षही नाही. सोनियाजी गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. युपीएची चिंता त्यांनी करु नये, असेही पटोले यांनी बजावले होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊत