शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

"देवेंद्र फडणवीसांसोबत भांडण, तरीही मी भाजपासोबत"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 1:47 PM

Mahadev Jankar : महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती.

ठळक मुद्देबुधवारी बारामतीत एका खासगी कार्यक्रमात महादेव जानकर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 

बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. रासप हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. तरीही महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. 

माझे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपासोबतच राहणार असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. बुधवारी बारामतीत एका खासगी कार्यक्रमात महादेव जानकर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 

भाजपावर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार आहे, असे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं असे सांगत माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे भांडण सुरु आहे. पण, त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे महादेव जानकर म्हणाले. 

याचबरोबर, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरुच असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. याशिवाय, माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात महादेव जानकर यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला लगावला.

दरम्यान, महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर नाराज आहेत, अशा चर्चांना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी शरद पवारांची घेतलेली भेट घेतल्याचे म्हटले जात होते. मात्र, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असे महादेव  जानकर यांनी स्पष्ट केले.

पवार भेटीनंतर महादेव जानकर काय म्हणाले होते ?आमचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या परवान्यासंदर्भात मी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर कारखान्याच्या परवान्याचे कामही झाले आहे. तसेच मी शरद पवार आणि अजित पवार यांना भेटणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनाही कळवले आहे, असे जानकर यांनी म्हटले होते. तसेच, काही लोक या भेटीचा वेगळा अर्थ काढत आहेत. मात्र असे करणे म्हणजे पराचा कावळा करण्यासारखे आहे. आमची भेट काही वेळापुरतीच होती त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही एनडीएत आहोत असेही महादेव जानकर यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahadev Jankarमहादेव जानकरBJPभाजपाSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार